Satara Rural Development Success: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सातारा जिल्ह्याने महिला सक्षमीकरणात मोठी झेप घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख ९० हजार महिलांना या अभियानाअंतर्गत लाभ मिळाला असून त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा स्तर उंचावला आहे. .बँकांचे अर्थसाह्य आणि शासनाच्या विविध निधींच्या जोरावर ग्रामीण महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. जिल्ह्यात हे अभियान सुरू झाल्यापासून महिलांचे संघटन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. ‘उमेद’ अभियान सुरू झाल्यापासून सातारा जिल्ह्यात २२ हजार १८७ स्वयंसाह्यता समूह बचत गट तयार करण्यात आले आहे. यामध्ये २ लाख २१ हजार ३८० कुटुंबांचा समावेश या अभियानांतर्गत आतापर्यंत २ हजार ३७७ बचत गटांच्या महिलांना उद्योग उभारणीसाठी १२२ कोटी २६ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत..UMED Scheme: ‘उमेद’च्या माध्यमातून प्रत्येक महिलेला ‘लखपती दीदी’ बनविणार.२१ हजार ६६४ बचत गटांना ३२ कोटी ५१ लाखांचा फिरता निधी वितरित करण्यात आला आहे. ३३३ ग्रामसंघ यांना ३ कोटी ७४ लाख, स्टार्टअप निधी १ हजार २१४ गटांना ९ कोटी १० लाख, तर ६२ प्रभाग संघांना २ कोटी १७ लाख रुपये वितरित करण्यात आले. महिला बचत गटांना बँकांनी मोठ्या प्रमाणात अर्थसाहाय्य केले आहे..UMED Mission: उमेद अभियानात काम करणाऱ्या महिलांना आता नवी ओळख, 'ग्रामसखी' या नावाने ओळखले जाणार.यामध्ये ५६ हजार ६२७ बचत गटांना १२०० कोटी ६ लाख ६३ हजार वितरित करण्यात आले आहे. तर वैयक्तिक उद्योग व्यवसाय कर्ज ६ हजार १६१ गटांना १०० कोटी ९ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. या अभियानाच्या माध्यामातून महिलांनी विविध उद्योगांची उभारणी असून ‘उमेद’ अभियानाने एक नवा टप्पा गाठला आहे..महिलांनी उमटविला ठसा‘उमेद’ अभियानामुळे ग्रामीण भागातील महिला केवळ उंबरठ्याबाहेर पडल्या नाहीत, तर त्या आता उद्योजक झाल्या आहेत. स्वतःच्या पायांवर उभ्या राहिल्याने कुटुंबाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यास यामुळे मदत झाली आहे. जिल्ह्यातील या ‘लखपती दीदी’ आता केवळ शेतीवर अवलंबून न राहता विविध प्रकारचे छोटे-मोठे उद्योग, गृहउद्योग आणि सेवा क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.