Yavatmal News: शक्तिपीठ महामार्गासाठी शेतजमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणले. परंतु, कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ होऊ देणार नाही आणि जमिनी घेतल्यास आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर मांडल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे..वर्धा ते सिंधुदुर्ग ‘शक्तिपीठ‘ महामार्गाचे यवतमाळ जिल्ह्यात मोजणीचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवारी (ता. ९) उमरखेड तालुक्यातील बेलखेड व आमला या शेत शिवारातील मोजणी करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला. शक्तिपीठ महामार्ग हा आम्हाला उद्ध्वस्त करून जात असून तो आम्ही होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी मोजणी करण्यास तीव्र विरोध दर्शवला. नारेबाजी सुरू करून शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. .Farmers Protest: जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध.शेतकऱ्यांचा उद्रेक पाहता पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस आल्यानंतरही शेतकरी आपल्या मतावर ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना आपल्या वाहनात बसवून उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणले. या महामार्गामुळे आम्ही भूमिहीन होणार असून आमच्या उदरनिर्वाहाचे साधन गेल्यानंतर आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी उपस्थित केला. त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी मोजणी करायचा आमचा कायदेशीर हक्क असून त्यासाठी तुम्ही विरोध करू नका. शासन दराच्या पाचपट पैसे देण्यासाठी बांधील आहे. त्या व्यतिरिक्त विहीर, कुंपण, घर, झाडे याचे सर्वेक्षण करून पैसे देण्यात येतील. तुम्हाला दाद मागायची असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता असा सल्ला दिला. तरीही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते..Farmers Protest: मागण्या मान्य न झाल्यास उड्या मारो आंदोलनाचा इशारा .जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना शक्तिपीठ न करण्याबाबत निवेदन दिले. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात मोजणीसाठी आले असता अधिकाऱ्यांना परत पाठवण्यात आले. परंतु, तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या. परंतु, आम्ही त्या घेतल्या नाहीत. आज पुन्हा मोजणीसाठी आले असता विरोध केला. आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, आमचा विरोध कायम राहील.-सिद्धेश्वर जगताप,शेतकरी, उमरखेड.आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या असून उमरखेड तालुक्यातील बेलखेड व आमला येथील भूसंपादन राहिले आहे. सद्यःस्थितीत मोजणी सुरू केली आहे. जमिनीच्या प्रतीनुसार रेडी रेटनरप्रमाणे पाचपट पैसे देण्यास शासन बांधील असून नोटिफिकेशन मंजूर झाले त्या दिवसापासून रेडी रेकनरवर १२ टक्के व्याजसुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्या निवारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- सखाराम मुळे, उपविभागीय अधिकारी, उमरखेड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.