Dharashiv News : उमरगा तालुक्यात पाणंद रस्ते, शेत रस्ते व गाडी रस्त्याचे काम महसूल सेवा सप्ताहात प्रशासनाने ऐरणीवर घेतले आहे. यातूनच ७२ किलोमीटर अंतराच्या ३७ शेतरस्त्यांच्या सीमांकनाला वेग दिला आहे. .यासोबत पाणंद रस्ते खुले करण्याच्या योजनेत जिल्हा नियोजन समितीने निधी मंजूर केला तर या कामाचा प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा लोकवाटा शरण पाटील फाउंडेशनने उचलला आहे. यातूनच तालुक्यातील २२ पाणंद रस्त्याचे काम वेगाने सुरु असून यातील दोन शेत व पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण झालेआहे. राहिलेल्या कामासाठी पावसाचा अडसर येत आहे. .Farm Road Encroachment : सांगलीतील ७०० पाणंद रस्ते होणार अतिक्रमणमुक्त .वर्षोनूवर्षा काटेरी झुडप्याने अन् अतिक्रमणाने दुरवस्थेतील शेत रस्ते, गाडी रस्ता अन् पाणंद रस्त्यामुळे शेतीतील माल, ऊस नेण्यासाठी अडचण ठरते. दरम्यान महसुल प्रशासनाकडे शेत रस्ते खुले करून देण्यासाठी अनेक प्रस्ताव दाखल आहेत. तहसीलदार गोविंद येरमे यांनी आपल्या कार्यकाळात १०४ शेत रस्ते खुले करून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून गतीने प्रयत्न केले. या शेत रस्त्याची सातबारा उताराला नोंद झालेली आहे. .तालुक्यातील आलूर, बेळंब, गुगळगांव, त्रिकोळी, सुंदरवाडी, तुगांव, कुन्हाळी, केसरजवळगा, भूसणी, कंटेकुर आदी गावातील २२ पाणंद रस्त्याच्या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, या रस्त्याचे भूमिपूजनही झाले आहे. यातील दोन रस्त्याच्या मजबुतीकरणाचे कामही झाले आहे..Farm Road Issue : साताऱ्यातील ३८६ पाणंद रस्त्यांची होणार दुरुस्ती .कामासाठी निधी मंजूर आहे पण सातत्याने पाऊस सुरु असल्याने तूर्त काम बंद आहे. येणाऱ्या काही दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. भाजपाचे युवा नेते शरण पाटील यांनी शेतकऱ्यांशी निगडित विविध अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे..त्यांच्या शरण पाटील फाउंडेशनने प्रत्येक पाणंद रस्त्यासाठी लोकवाट्याची पन्नास हजार रुपये दिल्याने कामाला गती मिळत आहे. युवा नेते शरण पाटील यांच्या हस्ते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गोविंद येरमे यांच्या उपस्थितीत पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभही यापूर्वी झाला आहे. लोहारा तालुक्यातही अशाच पद्धतीचे काम होणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.