Bhandara News: खरीप हंगाम २०२४-२५ मधील धान खरेदीसाठी केंद्र शासनाने जाहीर केलेला विशेष प्रोत्साहनपर बोनस अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. ही रक्कम वर्षभरापासून प्रलंबित राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सर्व धान खरेदी केंद्रांना २० जानेवारीपर्यंत वंचित शेतकऱ्यांचे सातबारा व आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा, संबंधित खरेदी संस्थांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे..भंडारा जिल्ह्यात खरिपात मोठ्या प्रमाणावर धान खरेदी झाली होती. शासनाने प्रति हेक्टर २० हजार रुपयांपर्यंत (जास्तीत जास्त दोन हेक्टर) बोनस देण्याची घोषणा केली होती. मात्र अनेक केंद्रांनी वेळेत कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हजारो शेतकरी या बोनसपासून वंचित राहिले आहेत..Paddy Bonus : सात हजारांवर शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रतीक्षा.जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘खरेदी संस्थांनी खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे सातबारा, जमीनधारणा व इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ती २० जानेवारीपर्यंत पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पुढील बोनस वितरण रखडेल आणि त्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर राहील.’’.Paddy Bonus : दीड लाखावर धान उत्पादकांना मिळणार १८० कोटींचा बोनस.धान खरेदी संस्थांनी यापूर्वी शासनाकडे अनेकवेळा मागण्या केल्या होत्या. मात्र कागदपत्रांच्या त्रुटी, अपूर्ण नोंदी आणि प्रशासकीय विलंबामुळे बोनस वितरण प्रक्रिया खोळंबली आहे. जिल्ह्यात सध्या हजारो शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत असून, कर्जफेड, खत-बियाणे खरेदी व आगामी हंगामाच्या तयारीसाठी या रकमेवर त्यांचा मोठा आधार आहे. लाखनी तालुक्यातील शेतकरी गणेश गजभिये म्हणाले, ‘‘धान विकून वर्ष झाले तरी बोनस मिळालेला नाही. वारंवार केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत आहेत.’’ तर पवनी येथील शेतकरी सरिता उके यांनी सांगितले, ‘‘सातबारा दिला होता, पण अपलोड न झाल्याचे आता सांगण्यात येते. शासनाने यावर ठोस कारवाई करावी.’’.वेळेत प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांनाच बोनसदरम्यान, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, वेळेत प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस मिळेल, तर दिरंगाई करणाऱ्या खरेदी संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. त्यामुळे आता सर्व खरेदी केंद्रांवर हालचालींना वेग आला असून, शेतकऱ्यांनाही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी बोलावले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.