Solapur News: दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथील उळे शेतकरी कंपनीने ओमानला केळीची पहिल्यांदाच निर्यात करून जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. वेग्रो कंपनीच्या सहकार्याने शेतकरी उत्पादक कंपनीने २० टन केळीची निर्यात केली. या भागातील शेतकऱ्यांना यानिमित्ताने जागतिक बाजारात प्रवेशाची संधी मिळाली आहे..उळे येथील बहुतांश शेतकरी द्राक्ष उत्पादन घेतात. मात्र त्यांना त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करूनही द्राक्ष काढणीनंतरच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. शीतगृह, पॅकिंग हाऊस नसल्यामुळे व्यापाऱ्यांना आणि स्थानिक बाजारात कमी दरात द्राक्ष विकावे लागत होते. शिवाय त्यासाठी अन्य जिल्ह्यात द्राक्ष न्यावे लागत होते. त्यावर मात करण्यासाठी २०१७ मध्ये उळे शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली..Banana Rate: केळी दर नीचांकी स्थितीत.स्मार्ट प्रकल्पांतर्गत (मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन) कंपनीने शीतगृह, प्री - कूलिंग युनिट्स आणि पॅकिंग हाऊसची उभारणी केल्यानंतर ही परिस्थिती बदलली असून, यामुळे शेतकरी निर्यातक्षम उत्पादनासह वर्गीकरण, प्रतवारी, पॅकिंग आणि शीतगृह व्यवस्थापन याद्वारे जागतिक मानके पूर्ण करण्यात यशस्वी ठरले आहेत..ओमानमध्ये निर्यातीच्या संधीनंतर भागधारक शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. आता आम्ही वेग्रो या ॲग्रिटेक प्लॅटफॉर्मच्या मध्यस्थीने आंतरराष्ट्रीय शेती बाजारात सहभागी झालो आहोत. येत्या काळात गुंतवणूकक्षम बनल्यावर पॅलेडियमच्या मार्गदर्शनाखाली कंपनी थेट निर्यातीत उतरेल. यातून ग्रामीण सक्षमीकरण साधले जाणार असून निर्यातक्षम उत्पादन वाढीसाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचे कंपनीचे प्रमुख अप्पा धनके यांनी सांगितले..Banana Farming : दर्जेदार घड निर्मितीसाठी केळीत रोग व्यवस्थापन महत्त्वाचे.केळी उत्पादन ५०० एकरांपर्यंत वाढविणारआज या कंपनीचे एक हजार १२७ शेतकरी भागधारक आहेत. त्यांनी १०० एकरांवर केळीची लागवड करत निर्यातीसाठी आगाऊ नोंदणी केली होती. ओमानला यशस्वी निर्यातीनंतर कंपनीने केळीचे उत्पादन ५०० एकरांपर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे. तसेच ओमान, इराकसह मध्य पूर्वेतील बाजारपेठेत माल पाठवण्याची योजना आखली आहे..केळी निर्यातीत राज्य सरकारच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत पॅलेडियमने मार्गदर्शन व तांत्रिक साह्य याद्वारे महत्त्वाची भूमिका निभावली आहे. यंदाच्या हंगामात ३०० एकर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाची तयारी केली आहे. त्या माध्यमातून १५० कंटेनर द्राक्ष निर्यातीचे लक्ष्य निश्चित केले आहे.अप्पा धनके, प्रमुख, उळे शेतकरी उत्पादक कंपनी, उळे, ता. दक्षिण सोलापूर.‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत २८ कंपन्यांची निवड केली आहे. जिल्ह्यात निर्यातक्षम उत्पादन व त्याची निर्यात करू शकणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. जिल्ह्यातील अन्य शेतकरी उत्पादक कंपन्यांनीही या दिशेने पावले टाकायला हवीत. यातून ग्रामीण सक्षमीकरण साध्य होईल.कांतप्पा खोत, प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.