Maharashtra Monsoon Dam Update: उजनी धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असून, त्या धरणांतून उजनी धरणाकडे होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात प्रचंड वाढ झाली आहे. या मोठ्या आवकेमुळे गेल्या २४ तासांत धरणाच्या उपयुक्त जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे..मंगळवारी (ता. ७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास १ लाख ६१ हजार ८४८ क्युसेक इतका विसर्ग उजनी धरणात दाखल होत होता. पाण्याचा हाच वेग कायम राहिल्यास बुधवारी (ता. ८) धरण उणे (मायनस) पातळीतून बाहेर पडून ‘अधिक’ (उपयुक्त साठ्यात) पातळीत येण्याची शक्यता आहे..Dam Water Storage: येलदरीत ५२.४५ टक्के, सिद्धेश्वरमध्ये उपयुक्त साठा शून्यावर.गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणाची पाणीपातळी चिंताजनक बनली होती. सोमवारी (ता. ६) सकाळी धरणातील उपयुक्त पाणीसाठा उणे २७.२३ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतीपंपांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता..Dam Water Storage Update: नांदेड जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ३०.८६ टक्के पाणीसाठा.मात्र, मंगळवारी (ता. ७) सकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी वाढून उणे २०.२१ टक्क्यांवर आली. अवघ्या २४ तासांतच पाणीपातळीत साडेसात टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाय, हवामान विभागाने पुढील काही दिवस घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे..उजनी धरणातील मंगळवारचा पाणीसाठा (दुपारी १२ ची स्थिती)पाणीपातळी ४८९.८१० मीटरएकूण पाणीसाठा ५५.६३ टीएमसीउपयुक्त साठा उणे-०८.०२ टीएमसीपाणीसाठ्याची टक्केवारी उणे १४.९८ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.