Environmental Crisis: राज्यातील महत्त्वाचा जलस्रोत असलेले उजनी धरण सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून पाणी ‘विषारी’ बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पाण्यातील जड धातू, सांडपाणी आणि कार्सिनोजेनिक घटकांमुळे कर्करोगासह गंभीर आजारांचा धोका वाढला असून जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे. मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) आणि सिप्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या २०२५-२६ च्या ‘उजनी जलाशय जल गुणवत्ता मापदंड मूल्यांकन’ अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे..औद्योगिक आणि नागरी सांडपाण्याचा फटकादेवी वायंगणकर, मयंक शर्मा आणि डॉ. उन्मेश काटवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासानुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या मोठ्या औद्योगिक केंद्रांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि शेतीतील रासायनिक अवशेष भीमा नदीद्वारे थेट उजनी जलाशयात मिसळत आहेत. यामुळे या जलाशयाचे पर्यावरणीय संतुलन पूर्णपणे विस्कळित झाले आहे..Panchganga River Pollution: पंचगंगा काठच्या गावांना काळ्या पाण्याची शिक्षा.स्थानिक मासे झाले हद्दपारप्रदूषणामुळे उजनीतील जैवविविधतेवरही कुऱ्हाड कोसळली आहे. गेल्या दोन दशकांत येथील स्थानिक माशांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत..धोका कसा...कॅडमियम आणि पाऱ्याचे प्रमाण उजनीच्या पाण्यात सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप अधिक आहे. कॅडमियममध्ये ‘हाय कॅन्सर स्लोप फॅक्टर’ (High CSF) जास्त असतो. याचा अर्थ असा की, हे पदार्थ शरीरात गेल्यास कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. जरी हे धातू सूक्ष्म प्रमाणात असले, तरी त्यांची ‘बायो-ॲक्युम्युलेशन’ (शरीरात साठून राहण्याची क्षमता) प्रक्रिया घातक ठरते..Ujani Dam Pollution: हलगर्जीपणाचा कळस.क्रोमियम : क्रोमियमचे विशिष्ट प्रकार (उदा., हेक्झाव्हॅलंट क्रोमियम) हे अत्यंत कार्सिनोजेनिक मानले जातात. औद्योगिक सांडपाण्यामुळे याचे प्रमाण वाढल्यास ते पिण्याच्या पाण्यातून किंवा अन्नातून शरीरात गेल्यावर पेशींच्या डीएनएला हानी पोचवू शकतात. हे मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे..पाणी बनले अल्कधर्मीडिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत २२ विविध ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांमध्ये पाण्याचा सामू (pH) (पाणी किती आंबट किंवा क्षारीय (अल्कधर्मी) आहे) ८.०६ ते ९.०५ च्या दरम्यान आढळला आहे. डिस्काळ (९.०५) आणि वांगी नंबर १ (९.०) या ठिकाणी पाण्याची पातळी सर्वाधिक अल्कधर्मी नोंदवण्यात आली आहे, जी सुरक्षित मर्यादेपेक्षा (८.५) जास्त आहे. तसेच, सेंद्रिय (घाण/कचरा) प्रदूषणाचे प्रमाण (बीओडी) आजोती आणि शिरसोडी भागात सर्वाधिक आढळले आहे. या भागातील पाण्यात घाण किंवा सांडपाण्याचे प्रमाण जास्त आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.