Ujani Dam Rainfall Impact: यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.१०) दुपारी १२ च्या अहवालानुसार, उजनी धरणाची उपयुक्त पाण्याची टक्केवारी ४४.७४ टक्क्यांवर पोहोचली असून, धरण आता वेगाने पन्नाशीकडे (५० टक्के) वाटचाल करत आहे. .उजनी धरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दौंडहून सध्या पाण्याची पातळी ४९९.३१० मीटरवर आहे. येथून उजनी धरणाकडे १७ हजार ६७ क्युसेकचा विसर्ग वेगाने धरणाकडे सातत्याने सुरू आहे. या मोठ्या विसर्गामुळे आगामी २४ ते ४८ तासांत उजनी धरण ५० टक्क्यांचा टप्पा सहज ओलांडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे..Ujani Dam Water Update: ‘उजनी’तील उपयुक्त साठा ३४.१४ टक्क्यांवर ! .उजनी धरण निम्म्याच्या जवळ पोहोचल्याने सोलापूर शहर-जिल्हा आणि परिसरातील शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास काही अंशी तरी मिटणार आहे. भीमा नदीकाठच्या गावांना आणि उजनीवर अवलंबून असणाऱ्या उपसा सिंचन योजनांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असाच सुरू राहिल्यास ऑगस्ट महिन्यापर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे..Ujani Dam: उजनी धरणातील साठा ‘उणे’तून ‘अधिक’कडे !.‘जायकवाडी’चा साठा ३० टक्केजायकवाडी धरणातील पाणीसाठा शुक्रवारी (ता.१०) दुपारपर्यंत ३० टक्क्यांवर पोहोचला असून, धरणात २८ हजार ४७७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. सकाळी सहाच्या सुमारास २०६१३ क्युसेकने आवक सुरू होती..उजनी धरणाची शुक्रवारची आकडेवारी (दुपारी १२ वा.) पाणीपातळी : ४९४.०१५ मीटरएकूण पाणीसाठा : ८७.६३ टीएमसीउपयुक्त पाणीसाठा : २३.८७ टीएमसी सध्याची टक्केवारी : ४४.७४ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.