Weather Update: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी उणे (मायनस) २७.२३ टक्क्यांवर गेलेले उजनी धरण आता अधिक (प्लस) साठ्यात आले असून, धरणातील उपयुक्त साठा गुरुवारी (ता. ९) दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल ३४.१४ टक्क्यांवर पोहोचला..दौंड येथून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे..Koyna Dam Storage: विक्रमी १६४ टीएमसी पाण्याची कोयना धरणात आवक .गुरुवारी दुपारी दोन वाजता नोंदविलेल्या आकडेवारीनुसार वरच्या धरणांकडून उजनी धरणात ७८ हजार ३८४ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे..Ujani Dam: उजनी धरणातील साठा ‘उणे’तून ‘अधिक’कडे !.गेल्या दोन दिवसांत धरणात तब्बल २० टीएमसीहून अधिक पाणी जमा झाले आहे. त्यामुळे अवघ्या चार ते पाच दिवसांतच धरण ‘उणे’मधून बाहेर पडले. बुधवारी (ता. ८) सायंकाळपर्यंत १८.५० टक्के असलेला उपयुक्त साठा गुरुवारी (ता. ९) दुपारी थेट ३४.१४ टक्क्यांवर पोहोचला..उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा लवकरच ५० टक्क्यांच्या पुढे जाईल, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.