Dam Water Level Update: सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी समजले जाणारे उजनी धरण मंगळवारी (ता. ५) उणे पातळीत पोहोचले. धरणातील उपयुक्त पाणीसाठा पूर्णतः संपल्याने आता उणे पातळीतून पाणी उपसा सुरू झाला असून, आगामी काळात पाऊस लांबल्यास जिल्ह्यात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही संकट गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे..गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण उणे पातळीत जाण्यास तब्बल १७ दिवसांचा उशीर झाला आहे. मागील वर्षी १८ एप्रिललाच धरण उणे पातळीत गेले होते. विशेष म्हणजे, गत वर्षी ९ ऑगस्ट रोजी धरण १०० टक्के भरले होते. मात्र वाढता पाणी उपसा आणि उन्हाळ्याची तीव्रता यामुळे धरणातील उपयुक्त साठा आता शून्यावर आला आहे. .Ujani Dam: उजनी धरणाची उपयुक्त पाणीपातळी उणे ०.६५ टक्के.सध्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी सोलापूर शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या औज बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे. हे पाणी जिल्ह्यातील शेवटच्या हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर पुढील तीन दिवसांत नदीतील सुमारे ६,००० क्युसेकचा विसर्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. .Ujani Water Dam: उजनी धरणातून एप्रिलअखेर भीमा नदीत पाणी सोडणार.उजनी धरणात तांत्रिकदृष्ट्या ६३.६५ टीएमसी इतका मृतसाठा उपलब्ध आहे. सलग दोन वर्षे दुष्काळ पडला, तरी परिस्थिती हाताळण्याची क्षमता या साठ्यात असल्याचे सांगितले जाते. मात्र हा साठा उपसणे खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक मानले जाते. त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास शेती क्षेत्राला पाणी कपातीचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे..दरवर्षी मे महिन्यात उजनी धरण उणे पातळीत जाणे हा आतापर्यंतचा कल राहिला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात २० टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.प्रशांत माने, शाखा अभियंता, उजनी धरण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.