Solapur News: कोरोना काळात कारखाने बंद असल्याने ज्या उजनी धरणाने मोकळा श्वास घेतला होता, तेच आता पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. औद्योगिक वसाहतींमधील रासायनिक सांडपाणी आणि शहरांतील मैलापाणी यामुळे धरणातील पाणी थेट ‘मृतावस्थेच्या’ (डेड झोन) दिशेने जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) शास्त्रज्ञांनी केलेल्या ताज्या अभ्यासानंतर हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे..‘बीएनएचएस’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भिगवण, कुंभारगाव, डाळज, कात्रज आणि पळसदेव परिसरातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली. या पाहणीत पाण्याच्या पृष्ठभागावर ऑइलपेंटसारखा दाट आणि हानिकारक हिरवा अल्कल तवंग आढळून आला आहे. हा तवंग जलचरांसाठी अक्षरशः मृत्युघंटा ठरत आहे..Ujani Dam: ‘उजनी’तून गुरूवारपासून शेतीसाठी पाणी मिळणार.विशेष म्हणजे, ‘बीएनएचएस’ आणि ‘सिप्ला फाऊंडेशन’मार्फत उजनीतील घातक मासे (मांगूर, सकर माऊथ कॅटफिश) नष्ट करून देशी कार्प जातीच्या माशांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प राबवला जात आहे. मात्र ‘‘पाणीच जर इतके विषारी असेल, तर माशांचे पुनरुज्जीवन कसे साध्य करायचे,’’ असा हतबल सवाल शास्त्रज्ञांनी उपस्थित केला आहे..शास्त्रज्ञांचा अहवाल सांगतो...तपासणीमध्ये पाण्याचे निकष अत्यंत खालावल्याचे दिसून आले आहे, त्यात सामान्यतः ३०० असणारा टीडीएस (टोटल डिझॉल्व्ह्ड सॉलिड्स - एकूण विरघळलेले घन पदार्थ) आता ७०० पीपीएम (पार्टिकल्स पर मिलियन - प्रति दशलक्ष भाग)पर्यंत पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) निकषांनुसार ३०० पेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी असुरक्षित मानले जाते..Ujani Dam: सादेपूरमध्ये दीड किमी कालवाच बुजवला.तसेच पाण्याचा पीएच (सामू) ७ अर्थात तटस्थ असणे अपेक्षित असताना तो ८.७ पर्यंत गेला आहे. यामुळे पाणी अत्यंत अल्कधर्मी (क्षारीय) झाले असून ते माशांच्या अस्तित्वासाठी घातक आहे. परिणामी, पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ५.२ ते ५.५ मिलिग्राम/लिटर इतके कमी झाले आहे, ज्यामुळे जलचर तणावाखाली आहेत. अर्थात, १४७ ते १६८ एमपी (मायक्रो प्लॅस्टिक्स) हे मूल्य पाण्यात मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया न केलेले सांडपाणी असल्याचे सिद्ध करते..उजनीतील पाण्याची सद्यःस्थिती जलचरांसाठी उच्च धोका निर्माण करणारी आहे. पाण्यातील वाढता क्षार आणि रासायनिक कचरा यामुळे मासे तग धरू शकणार नाहीत. पिण्यासाठीही हे पाणी आता अत्यंत असुरक्षित बनले आहे.- डॉ. उन्मेष काटवटे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, बीएनएचएस.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.