Pune News: हजारो मैलांचा प्रवास करून येणाऱ्या रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे उजनी धरणाच्या (यशवंतसागर) पाणलोटक्षेत्रात आगमन झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी यंदा पक्षी येतील का नाही याची धास्ती लागून राहिलेल्या व फ्लेमिंगोंच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या पक्षी निरीक्षक, पर्यटक, अभ्यासकांना आता दिलासा मिळाला आहे. .रोहित पक्ष्यांचे इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, डिकसळ भागात दर्शन होत आहे. येथील उजनीच्या पाणलोटक्षेत्रातील दलदलीच्या ठिकाणी हे पक्षी दिसून येत आहेत. येत्या आठवडाभरात पक्षांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पक्षी निरीक्षक व्यक्त करत आहेत. साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारीच्या सुरुवातीला येणाऱ्या या पाहुण्यांनी यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात हजेरी लावली आहे..Migratory Birds: हरिश्चंद्रगड परिसरात स्थलांतरित दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन.गतवर्षी लांबलेल्या परतीच्या पावसामुळे धरण गेल्या आठवड्यापर्यंत तुडुंब होते. परिणामी या पक्ष्यांना अन्नासाठी आवश्यक असलेल्या उथळ पाण्याची व दलदलीची ठिकाणे तयार झाली नव्हती. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून धरणातून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडले जात असल्याने, पात्रात ठिकठिकाणी दलदलीचे भाग तयार झाले आहेत. यामध्ये या पक्ष्यांना त्यांचे आवडते खाद्य मिळणे सोईचे झाल्याने या पक्षांचे थवे यशवंत सागरात उतरू लागले आहेत..Migratory Birds: पक्ष्यांची पंढरी सुनी.पक्ष्यांमुळे हक्काचा रोजगार प्राप्तकुंभारगाव येथील क्रांती फ्लेमिंगो पाईंटचे दत्ता नगरे म्हणाले की, उजनीवर येणाऱ्या पक्ष्यांमुळे येथील स्थानिक नौकाविहार व हाॅटेल व्यावसायिकांना हक्काचा रोजगार प्राप्त झाला आहे. यंदा नियमित वेळेपेक्षा उशिराने फ्लेमिंगो पक्ष्यांनी हजेरी लावली..मात्र आतापर्यंत उजनीवर फ्लेमिंगो नसल्याने पर्यटक व पक्षी निरीक्षकांनीही गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाठ फिरविली होती. आता धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने, येत्या काही दिवसांत येथे पक्ष्यांची संख्या कमालीची वाढलेली असेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.