Solapur News : उजनी व वीर धरणातून १ लाख ८७ हजार ८५० क्युसेक पाणी सोडल्याने मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला. यामध्ये नदीकाठची हातातोंडाशी आलेली पिके सध्या पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे..पुणे परिसर व नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. हे सर्व पाणी उजनी व वीर धरणात आले. पुढे पाणी सोडल्याने भीमेला पूर आला. यंदा दोन वेळा भीमा नदी पूरसदृश परिस्थितीत वाहिली. मध्यंतरी आलेल्या पाण्यामुळे वडापूर -सिद्धापूर को.प. बंधाऱ्याचा भराव वाहून गेला होता. नागरिकांच्या मागणीनंतर हा भरावा पुन्हा टाकण्यात आला..Rain Crop Damage : पावसाचा २९ हजार हेक्टरला फटका .मात्र सध्या आलेल्या पाण्यामुळे पुन्हा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील भीमा नदी काठी उचेठाण, बठाण, माचणूर, अरळी, वडापूर, सिद्धापूर, आदी को. प. बंधारे पाण्याखाली गेले असून तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर मंदिरातील श्री जटाशंकर मंदिरही पाण्याखाली गेले. .Crop Damage : सांगलीत अतिवृष्टी, पुराचा पाच हजार हेक्टरवरील पिकांना फटका.भीमा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीशैल हालकुडे हे परिस्थितीवर लक्ष ठेवू आहेत. तालुक्यातील ऊस, कांदा, केळी, कडवळ, डाळिंब, द्राक्ष, मका, भाजीपाला या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. आ. समाधान आवताडे यांनीही प्रशासनास दक्ष राहण्यास सांगितले..सतत पडणाऱ्या पावसामुळे आधीच फळबागाचे नुकसान झाले आहे. त्यात उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सिद्धापूर येथील ऊस, उडीद, केळी आदी पिकासह मका, कडवळ सह जनावरांचा चारा पाण्याखाली गेल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.- अनिल बिराजदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.