Uddhav Thackeray: गद्दारांच्या किडीने महाराष्ट्र पोखरला : उद्धव ठाकरे
Maharashtra Politics: ‘‘गद्दारांच्या किडीने महाराष्ट्र पोखरला आहे. या गद्दारांची कीड हा परभणीचा दुर्देवी इतिहास झाला आहे. अशा गद्दारांच्या मुळांवर घाव घातला पाहिजे. त्यांच्यावर आसूड चालविण्याचे काम जनतेला करायचे आहे. देशात कायद्याचे राज्य असेल तर ते सहा खासदार बाद झाले पाहिजेत.’’