पक्ष, मतं चोरलीत, आता जमीनही चोरायला लागेलत, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोलचौकशी समिती नेमतील, क्लिन चिट देतील, विषय संपला...शेतकरी चोहोबाजूने संकटात, त्याला हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची मागणी.Uddhav Thackeray Criticizes Ajit Pawar: ''पक्ष तर चोरलात, मतं तर चोरलीत, आता जमीनही चोरायला लागेलत,'' अशा शब्दांत ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ही चौकशी करु, मुख्यमंत्री कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. चौकशी समिती नेमतील, क्लिन चिट देतील, विषय संपला, झालंय की नाही तसं..., असे म्हणत त्यांनी सध्या गाजत असलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणावर भाष्य केले. .अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर पुणे येथील सरकारी जमीन कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुंढवा येथील कथित जमीन खरेदी सरकारी यंत्रणांनी रद्द केली असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची चौकशी महिनाभरात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावरुन ठाकरेंनी पवारांवर जोरदार हल्लाबोल केला..Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन खरेदी रद्द : उपमुख्यमंत्री पवार.उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. त्यांनी आज मराठवाडा संवाद दौऱ्याच्या चौथ्या दिवशी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात ताड बोरगाव येथील शेतकऱ्यांसी संवाद साधला. शेतकऱ्यांना पुन्हा नव्या जिद्दीने उठून उभं राहायला, शेतकऱ्यांना लढायला बळ देण्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळलाच पाहिजे, अशा मागणीसह शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला..अजित पवार म्हणतायेत हातपाय हलवा. तो हातपाय हलवायतोय म्हणून तुम्ही जेवताय. कर्जमुक्ती झालीच पाहिजे. शेतकरी कष्टाचे दाम मागतोय. त्याला हमीभाव मिळत नाही. शेतकरी चोहोबाजूने संकटात असून त्याला हेक्टरी ५० हजार रुपये मिळालेच पाहिजेत, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. .Parth Pawar : पार्थ पवारांनी १८०० कोटींची जमीन ३०० कोटींमध्ये हडपली; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप.आता शेतकरी म्हणून एकवटा, मातीतून तुम्ही कोंब फोडता तर या सरकारला पाझर नाही फोडू शकत? शेतकऱ्यांची ताकद काय असते ती दाखवून द्या! आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे..यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, आमदार डॉ. राहुल पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.