Parbhani News: परभणी जिल्हा परिषद व ९ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या जिल्हा परिषदेतील सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भारतीय जनता पक्षाने ताकद लावली आहे. दुरंगी, तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारात आश्वासनांची खैरात केली जाते. परंतु पूर्तता केली जात नाही. त्यामुळे पक्के रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, सक्षम पशुवैद्यकीय सेवेचा अभाव, रोजगाराअभावी होणारे स्थलांतर आदी समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत..यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ गटांमध्ये भारतीय जनता पक्ष ४९ जागांवर, काँग्रेस २१ जागांवर, शिवसेना (उबाठा) २४ जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४२ जागांवर, शिवसेना (शिंदे) २४ जागांवर निवडणूक लढवत आहे. सेलू तालुक्यात १ गटात कम्युनिष्ट पक्ष, पूर्णा तालुक्यात १ गटात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवत आहेत. दीर्घ कालखंडानंतर निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर सुरुवातीला काँग्रेस व त्यानंतर एकत्रित शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची सत्ता राहिली. .Local Body Elections: २४७ उमेदवार निवडणूक रिंगणात .भारतीय जनता पक्षाला दोन अंकी जागा मिळालेल्या नाहीत. पूर्वी ग्रामीण भागात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे प्राबल्य होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर समीकरणे बदली आहेत. जिंतूर, सेलू, मानवत तालुक्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढ होण्याची शक्यता आहे. परभणी, पाथरी तालुक्यात शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे), काँग्रेस अशी तिरंगी लढत होऊ शकते. सोनपेठ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे) यांच्यात गंगाखेड तालुक्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, पालम तालुक्यात भाजपा, शिवसेना (उबाठा) पूर्णा तालुक्यात भाजप व शिवसेना (उबाठा) यांच्या लढत होऊ शकते..जिल्ह्यातील काँग्रेसमधील मात्तब्बर नेतेमंडळी भाजपामध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते जाळे तयार झाले आहे. पाथरी व सोनपेठ तालुक्यातील ५ जागा वगळता इतर ४९ जागांवर भाजपाने उमेदवार दिले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे) यांनी परभणी व जिंतूर तालुक्यांत युती जाहीर केली होती. पाथरी तालुक्यात भाजप व शिवसेना (शिंदे) गटात युतीची चर्चा आहे. इतर पक्षात निवडणूकपूर्व युती व आघाडी नाही. ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे भारतीय जनता पक्षातील इच्छुकांनी बंडखोरी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवारी मिळविली..Local Body Elections: चाकूर तालुक्यात दोन अर्ज अवैध.रस्ते पाणीपुरवठा,स्थलांतराचे प्रश्न कायम...गावांना जोडणारे पक्के डांबरी रस्ते नाही.ग्रामीण पेयजल,जल स्वराज्य,भारत निर्माण आदी योजना अंतर्गंतच्या कामे व्यवस्थित झालेली नाहीत.त्यामुळे अनेक गावांवा शुध्द पाणीपुरवठा होत नाही.मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीची रखडतेली देयके.अनेक ठिकाणच्या शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाने यांची दुरवस्था झाली आहे. गावात रोजगार नसल्यामुळे जिंतूर,गंगाखेड,पालम तसेच इतरही तालुक्यातून पुणे,नाशिक,छत्रपतीसंभाजीनगर आदी महानगरामध्ये मोठ्याप्रमाणात स्थलांतर होते..यंदाच्या निवडणूक प्रचारा दरम्यान वैयक्तीक लाभाच्या योजनांचा घरकुल,सिंचन विहिरींचा लाभ मिळवून देण्यासह प्रलंबित रस्ते,पूल,इतर पायाभूत सुविधांची भरभरुन आश्वासने दिली जात आहेत.दर्जेदार शुध्द पाणीपुरवठा,शिक्षणआरोग्य केंद्रामध्ये सर्व सुविधा,पशु चिकात्सालयात पुरेशा औषधी पुरवठा यासह महिला तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी पुरेसा निधीच्या तरतुदीसह योग्य विनियोग करुन कामांचा दर्जा राखला जावा अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.