Ratnagiri News: पंतप्रधान पीकविमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राबवली जाते; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेअंतर्गत विमा काढलेल्या सुमारे सव्वादोन हजार शेतकऱ्यांना एक रुपयाचीही भरपाई अद्याप मिळालेली नाही. विमा परतावा देण्याबाबतच्या निकषांमधील बदल आणि पीक कापणी प्रयोगांवर अवलंबून असलेली प्रक्रिया यामुळे यंदा नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे..रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामातील विमा योजनेला तितकासा प्रतिसाद मिळत नाही. परंतु शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या भातशेतीलाही विमा परतावा देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलली आहे. तीन वर्षांत खरीप हंगामात विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे. यंदा म्हणजेच २०२५-२६ या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात २ हजार २५७ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. त्यांचे ५७९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. .Crop Insurance: विश्वास वाढवा, सहभागही वाढेल.यामध्ये भाताचे २ हजार १७६ शेतकऱ्यांचे ५५४ हेक्टर क्षेत्र तर नागलीतील ८१ शेतकऱ्यांचे २५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. त्यापोटी शेतकऱ्यांनी हप्ता रक्कमही भरलेली आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत, विशेषतः ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कमी कालवधीची आणि मध्यम कालावधीत तयार होणारी भात पिके पावसामुळे बाधित झाली. जिल्ह्यातील २० हजार ८११ शेतकऱ्यांचे ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. .त्यापोटी ४ कोटी रुपयांची मदत शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली. शासनाची मदत पोहोचली तरीही विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना अजूनही परतावा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे विमा काढला, हप्ता भरला आणि पिकांचे नुकसानही झाले. तरीही पीक कापणी प्रयोग न झाल्याने किंवा सरासरी उत्पादनात नुकसान कमी दाखवले गेल्याने भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून पीकविमा योजनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत..Rabi Crop Insurance: रब्बी हंगामात पीकविम्याबाबत शेतकरी उदासीन.दरम्यान, शासनाने विमा भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग हाच मुख्य आणि एकमेव निकष ठरवला आहे. जिल्ह्यात भाताचे क्षेत्र ५१ हजार हेक्टर इतके आहे. जिल्ह्याती कृषी विभागाने ९०० हून अधिक ठिकाणी पीक कापणी प्रयोग केलेले आहेत. ज्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग झाले, तिथे नुकसान नोंदले गेले, तरच तेथील विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोगातील मिळालेल्या उत्पादनावर विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा परतावा अवलंबून राहणार आहे..जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगातील आकडेवारी ऑनलाइन भरण्यात येत आहे. त्यामुळे विमा कंपनी निकषानुसार पुढील निर्णय घेईल. यंदा शासनाने एकाच निकषावर आधारीत विमा परतावा देण्याचे निश्चित केले आहे. यंदाची नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना परतावा निश्चितच मिळेल.- डॉ. शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषी अधिक्षक, रत्नागिरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.