Parbhani News: केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पामार्फत विकसित करण्यात आलेले ‘पीबीएनएस २२१’ (परभणी सुजलाम) आणि ‘पीबीएनएस २२२’ (परभणी सुफलाम) या दोन सुधारित वाणांना अधिसूचित वाण म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबतची अधिसूचना बुधवारी (ता.३१) काढण्यात आली आहे..परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पामार्फत करडईचे हे दोन सुधारित वाण २०२५ मध्ये विकसित करण्यात आले. हे वाण कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी योग्य असून अधिक उत्पादन व उत्पन्नवाढीच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. .Safflower Variety : करडईच्या दोन वाणास देश पातळीवर मान्यता.दर्जेदार उत्पादनामुळे बाजारपेठेत चांगला दर मिळणार आहे. वाणांचा परिपक्वता कालावधी १२५ ते १३० दिवस एवढा आहे. हे दोन्ही वाण झोन-१ साठी (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगण) शिफारशीत करण्यात आले आहेत..कुलगुरू डॉ. इंद्रमणी म्हणाले, की या नव्या वाणांच्या प्रसारणामुळे करडईच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास निश्चितच मदत होईल. अधिक तेलांश असलेले उत्पादन मिळेल. हे वाण कोरडवाहू व बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही उपयुक्त ठरतील..Safflower Varieties : करडईचे प्रमुख वाण अन् त्यांची वैशिष्ट्ये.डॉ. खिजर बेग या वाणांबाबत माहिती देताना म्हणाले, की दोन नवीन वाणांच्या प्रसारामुळे करडईच्या उत्पादनातील स्थैर्य वाढण्यास मोठी मदत होणार होईल. डॉ.इंद्रमणी, डॉ. बेग यांनी अखिल भारतीय करडई संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आर. आर. धुतमल सर्व संबंधितांचा अभिनंदन केले..वाणांची वैशिष्ट्येपीबीएनएस-२२१ (परभणी सुजलाम): मर रोग, अल्टरनेरिया रोग तसेच मावा किडीस सहनशील आहे. कोरडवाहू व बागायती क्षेत्रात लागवडीस योग्य. तेलाचे प्रमाण सुमारे ३४ टक्के आहे. बागायती क्षेत्रात क्षमता हेक्टरी १८ ते २० क्विंटल, तर कोरडवाहू क्षेत्रात हेक्टरी १२ ते १५ क्विंटल आहे..पीबीएनएस -२२२ (परभणी सुफलाम) : मर (फ्युजेरियम विल्ट) रोगास मध्यम प्रतिकारक आहे. तेलाचे प्रमाण सुमारे ३४.३८ टक्के आहे. कोरडवाहू व बागायती क्षेत्रात लागवडीसाठी योग्य आहे. बागायती क्षेत्रात हेक्टरी १८ ते २० क्विंटल, तर कोरडवाहू क्षेत्रात हेक्टरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन क्षमता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.