Ahilyanagar News: बिबट्याने मुलीचा बळी घेतल्याची आणि एका मुलावर हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) येथे सोमवारी (ता. १७) वन विभागाकडून एकाच दिवसात दोन बिबटे पकडण्यात आले. मात्र, पडलेला बिबटे नरभक्षक आहेत की अन्य दुसरेच, याबद्दल ग्रामस्थांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे परिसरात अद्यापही दहशतीचे वातावरण आहे..खारेकर्जुने येथे सहा वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर जवळच असलेल्या निंबळक येथेही एका आठ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला झाला होता. सुदैवाने मुलगा वाचला. मात्र, तो गंभीर जखमी झाला..Wildlife Conflict: जुन्नर तालुक्यात ऊसतोडणीमुळे बिबटे सैरभैर .बिबट्या हल्ल्याच्या सलग दोन घटना घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत अहिल्यानगर बायपासवर रास्ता रोको आंदोलन केले. बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वन विभागाच्या प्रधान सचिवांनी ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर दिले..Leopard Conflict: पाचशे बिबटे वनताराला पाठविणार : वनमंत्री नाईक .त्यासाठी बंदूकधारी नेमबाजांसह वन विभागाचे ७० कर्मचारी बिबट्याचा शोध घेत होते. पिंजरेही लावले. सोमवारी (ता. १७) पहाटे खारेकर्जुने शिवारात पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. वन विभागाने लोकांना न दाखवताच पिंजरा तेथून हलवला. त्यामुळे हल्ला करणाराच बिबट्या पकडला किंवा कसे, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. अशाप्रकारे वन विभागाच्या कारवाईवर अविश्वास व्यक्त होत आहे..शेतात जाण्याची भितीदोन बिबटे पकडूनही खारेकर्जुने, निंबळक, इसळक, देहरे, विळद परिसरातील शेतकरी, लोकांत दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. अजूनही लोक शेतात जाण्यास धजावत नाहीत. या भागात असलेले सर्व पिंजरे वापरून मोकाट फिरणारे बिबटे पकडून लोकांना दहशतमुक्त करावे, अशी मागणी खारेकर्जुने ग्रामस्थांनी केली आहे. खारेकर्जुने, निंबळक, इसळक, देहरे, विळद परिसरातील लोक दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.