Cop Loan Waiver Portal : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बायोमेट्रिकद्वारे (अंगठा) आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार करणे अनिवार्य आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार २८२ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. .पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार असून, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले..Farmer Loan Waiver Eligibility: जिल्हा सहकारी बँकेचे ३ हजार ८९९ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला २ जून २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांपैकी ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली कर्जे विचारात घेतली जाणार आहेत. पात्र शेतकऱ्यांना प्रतिशेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे..Crop Loan Issue: पांढरवाणी येथील विधवेची पीककर्जासाठी धावपळ.ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यानंतर शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच आर्थिक शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे..Loan Repayment: नियमित कर्जफेडणाऱ्यांना दोन टक्के व्याज परतावा.जिल्ह्यात यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात किंवा संबंधित बँकेत जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, त्यापूर्वी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार करणे आवश्यक आहे. फार्मर आयडी तयार झाल्यानंतरच आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार २८२ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. .कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, विकास सेवा सोसायटी कार्यालय तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या सूचना फलकावर उपलब्ध असतील. याशिवाय शासनाच्या अधिकृत कर्जमुक्ती पोर्टलवर किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात आधार क्रमांकाच्या साह्याने यादीतील नाव आणि संबंधित युनिक क्रमांक तपासता येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.