Farm Safety : कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद येथे शेततळ्यात बुडाल्याने दोन तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दीपक रामचंद्र पाचोरे (वय ३३) आणि प्रशांत गीतराम पाचोरे (वय ३४) अशी त्या शेतकऱ्यांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने बाहदराबाद गावांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..बाहदराबाद येथील दीपक आणि प्रशांत हे दोघेही शेतकरी शेतातील पिकावर फवारणी करण्यासाठी शेततळ्यातून पाणी घेण्यास गेले होते. शेततळ्यातून पाणी काढत असताना दीपक यांचा पाय घसरून ते शेततळ्यात पडले. त्यांना वाचविण्यासाठी प्रशांत यांनी तळ्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. .Ashadhi Wari: एक तरी वारी अनुभवावी... .बराच वेळ दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना संशय आला. प्रशांत यांची पत्नी यांनी शेततळ्याकडे धाव घेतली असता, तळ्याजवळ फवारणीचा पंप पडलेला दिसला. गावकऱ्यांनी तातडीने शेततळ्यात शोधमोहीम सुरू केली. त्यात प्रशांत बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. .Rural Story: गोंदणवाडीचं पाव्हणं.मात्र दीपक यांचा शोध लागत नव्हता. यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. शेततळे फोडून पाणी कमी करून शोधमोहीम राबविण्यात आली. बऱ्याच प्रयत्नांनंतर दीपक यांचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला..दोघांनाही तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन कर्त्या तरुण शेतकऱ्यांच्या अकाली निधनाने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.