Akola News: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदांसाठी होणारी निवडणूक अखेर गुरुवारी (ता. ५) बिनविरोध पार पडली. विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने मतदारसंघ एकमधून डॉ. रणजित सपकाळ, तर मतदारसंघ दोनमधून वल्लभराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. .मतदारसंघ एकमधून नाना देशमुख (चरणगाव) यांनी, तर मतदारसंघ दोनमधून अॅड. विष्णूपंत सोळंके (परभणी), भूषण देशमुख यांनी आपले अर्ज मागे घेतले, तसेच दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. महाबीज स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याने हे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे..Mahabeej Director Election: ‘महाबीज’च्या संचालकपदांची निवडणूक प्रक्रिया सुरू.या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते. उमेदवारांमध्ये झालेल्या समन्वयामुळे उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच गुरुवारी (ता. ५) ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडीनंतर समर्थकांनी नवनिर्वाचित संचालकांचे जल्लोषात स्वागत केले..Marketing Director: पणन संचालकपदी कोण,कदम, खंडागळे की गिरी? .‘महाबीज’च्या वतीने गुणनियंत्रण व संशोधन महाव्यवस्थापक प्रफुल्ल लहाने, विपणन महाव्यवस्थापक विजयकुमार देशमुख, उत्पादन महाव्यवस्थापक विवेक ठाकरे, प्रक्रिया व अभियांत्रिकी महाव्यवस्थापक प्रशांत पागृत, कंपनी सचिव विनय वर्मा यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले..‘विश्वास टिकवून ठेवू’निवडीनंतर बोलताना ज्येष्ठ संचालक वल्लभराव देशमुख आणि डॉ. रणजित सपकाळ म्हणाले, ‘‘महाबीज म्हणजे शेतकऱ्यांच्या विश्वासाचे महामंडळ आहे. हा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू. शेतकऱ्यांच्या बीजोत्पादनाला योग्य दर, तसेच दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यावर भर राहील. भागधारकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि महाबीजची आजवरची लौकिक परंपरा कायम राखण्यास प्राधान्य देऊ.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.