रेणुका मिसाळ, डॉ. के. एस. गाढे लोणचे सामग्री ः २५० ग्रॅम साल काढून बारीक चिरलेले आले, १ कप लिंबाचा रस, २ चमचे मोहरीचे तेल, १ चमचा मोहरी, १ चमचा जिरे, १ चमचा हळद, १ चमचा मिरची पावडर, १ चमचा हिंग, मीठ चवीनुसार.कृतीआले स्वच्छ धुवून सोलून बारीक चिरावे.स्वच्छ आणि कोरड्या बाऊलमध्ये चिरलेले आले आणि लिंबाचा रस एकत्र करावा. हे मिश्रण २ ते ३ दिवस झाकून ठेवावे. यामुळे आले लिंबाच्या रसात मुरते.२ ते ३ दिवसानंतर आले आणि लिंबाचा रस मिश्रणात हळद, मीठ आणि मिरची पावडर घालून एकत्र करावे..Ginger Turmeric Crops: आले, हळद पिकांसाठी आता संघर्ष करणार.एका कढईत मोहरीचे तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी, ती फुटू द्यावी. त्यानंतर जिरे आणि हिंग घालून चांगले परतून घ्यावे. हे मिश्रण आले आणि लिंबाच्या मिश्रणावर ओतावे आणि चांगले एकत्र करावे.तयार झालेले लोणचे एका स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरावे. काही दिवस ठेवून द्यावे. यामुळे लोणचे चांगले मुरते..कॅण्डीसामग्री : २५० ग्रॅम छोटे तुकडे केलेले आले, १ कप साखर,२ कप पाणी, १ चमचा लिंबाचा रस,साखर (कोटिंगसाठी).Ginger Crop Disease : आले पिकामध्ये कंदकुज, करप्याचा प्रादुर्भाव .कृतीआले स्वच्छ धुवून साल काढून छोटे तुकडे करावेत.एका भांड्यात पाणी गरम करून त्यात आल्याचे तुकडे टाकून १०-१५ मिनिटे उकळावे. यामुळे आले मऊ होते. उकळलेले आले चाळणीतून काढून पाणी गाळून घ्यावे..एका जाड बुडाच्या पातेल्यात २ कप पाणी आणि साखर एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवत राहावे. साखरेचा पाक तयार झाल्यावर त्यात उकळलेल्या आल्याचे तुकडे टाकावेत. मंद आचेवर शिजवावे.पाक घट्ट होईपर्यंत आणि आले तुकडे पाकाने पूर्णपणे मुरेपर्यंत शिजवावेत. यामध्ये लिंबाचा रस मिसळावा.तुकडे पाकातून काढून गाळून घ्यावेत. एका ताटात किंवा ट्रे वर पसरवून ठेवावेत. हे तुकडे थोडेसे वाळवून,त्यानंतर त्यावर साखर कोटिंग करावे.कँडी पूर्णपणे थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या डब्यात भरावेत.- रेणुका मिसाळ ८५३०५७५२०४(एम.टेक., विद्यार्थी, अन्न तंत्र महाविद्यालय, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.