Marathi Literature: संजय प्र. चिटणीस पुस्तकाचे नाव : दोन एकरलेखक : राजेंद्र गहाळ प्रकाशक : डॉ. दीपक चांदणे व अस्मिता चांदणे, प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणेपृष्ठे : ११२ मूल्य : २५० रुपये.मराठी साहित्यात एकविसाव्या शतकात ललित लेखनामध्ये नवी पिढी आली. नव्वदोत्तर साहित्यात मराठवाड्यात प्रामुख्याने रा. रं. बोराडे, भास्कर चंदनशिव, वासुदेव मुलाटे, शेषराव मोहिते, जगदीश कदम, रेखा बैजल अशी महत्त्वाची नावे दिसतात. त्यानंतर अनेकांनी या पायवाटेवरून सुरुवात करत नव्या वाटा चोखाळायला सुरू केल्या. या नव्या लेखकांनी आपल्या समाजातील जीवन संघर्षाचे अनुभवाला आकार देण्यात कविता नेहमीच अग्रेसर असली तरी अनेकांनी कथा स्वरूपाची कलात्मक वाट पकडली. .Book Review: समजून घेऊयात ‘शाश्वत नैसर्गिक शेती’.मराठवाड्यातील सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक अवकाश टिपण्याचा प्रयत्न केला. त्याला मराठवाड्यातील संघर्षमय इतिहासाची नाळ जोडलेली आहे. अस्मानी, सुलतानीच्या जोखडात संघर्ष करणारे नायक आपल्याला या काळातील सर्वच साहित्य प्रकारातून भेटत राहिले. या काळात नवीन लिहित्या झालेल्या पिढीतील नावामध्ये आसाराम लोमटे, देविदास फुलारी, विलास सिंदगीकर,.भारत काळे, अशोक अर्धापुरकर, केशव वसेकर, बाबा कोटंबे, महेश मोरे, प्रकाश मोगले, बालाजी इंगळे, प्रसाद कुमठेकर, देविदास सौदागर, राजेंद्र गहाळ अशी अनेक नावे पुढे येतात. मागील पिढीतील भास्कर चंदनशिव, जगदीश कदम यांच्या कथेतील योगदानाला अनुसरून नव्या पिढीचे लेखक राजेंद्र गहाळ यांचे कथालेखनही स्पृहणीय आहे. त्यांच्या कथा लेखनाच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे..Book Review: पशुसमृद्धीचे संशोधकीय गंठण.राजेंद्र गहाळ यांचा दोन एकर या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे यांच्या वतीने प्रकाशित या दुसऱ्या आवृत्तीचे कलात्मक मुखपृष्ठ आघाडीचे चित्रकार सरदार जाधव यांनी रेखाटले असून, आतील रेखाचित्रे ही त्यांचीच आहेत. ते या दुसऱ्या आवृत्तीचे बलस्थान ठरले आहे..‘दोन एकर’मधील सुमारे १७ कथांमधून लेखकाने ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन मांडलेले आहेत. कथा विषयांच्या दृष्टीने व्यक्तिचित्रणे, ग्रामीण महिलांच्या समस्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषय हाताळले आहेत वेगाने घडत असलेल्या सामाजिक बदलामुळे कुटुंब व्यवस्थेचा कणा पार मोडून पडलेला आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी लोक आक्रमक होताना दिसत आहेत. बबन, सरला यांच्या सुखी संसारात स्थावर मालमत्तेसाठी जाच करणारी सासू मैनाबाई किती नीच थराला जाते, याचे चित्रण आहे. .वावर विकत घेण्यासाठी सरलाने माहेरहून पैसे आणून द्यावेत, यासाठी जाच करत राहते. शेवटी सुनेला फसवून विहिरीत ढकलून देते. या सर्व प्रसंगात बबन हा पुरुष मूक राहतो हे अतिशय चिंतेची बाब दिसते. स्वार्थ लोलुपता, नीतिमुल्यांचा अभाव. त्यातून समाजातील आर्थिक वास्तव व जीवघेणी स्पर्धा माणसाला माणुसकीपासून दूर लोटते व अपराध करण्याचे वाढत चाललेले धाडस यावर ही कथा भाष्य करते. फसवणूक, गुन्हेगारी हे आजच्या जगण्याचे एक वैशिष्ट्य ठरत असताना जीवदान कथेतील फातेमा मावशी ही ‘व्यक्तिरेखा आदर्श वागणूक कशी असावी, याची मनात घर करणारे उदाहरण देते. .एकापेक्षा एक सुंदर कथांमध्ये परभणी जिल्ह्यातील गंगथडी भाषेचा वापर अनुभवाला समृद्ध करणारा ठरतो. अकृत्रिम अशा कथा विषयातून, पात्रामधून गहाळ यांचे कथाविश्व बहरत जाते. एखादा विचार, समाजातील परिवर्तन अचूकपणे टिपताना लेखकाची भाषाशैली वाचकांची दृष्टी अधिक व्यापक आणि प्रगल्भ करते, यात शंका नाही. त्यांचे एकाच वेळी तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. राजेंद्र गहाळ यांचे लेखन असे कायम माय मातीशी जोडलेले राहो, एवढीच अपेक्षा व्यक्त करताना त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे मनोमन वाटते.संजय चिटणीस ९२८४८८२५५८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.