Dharashiva News: धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. सात) मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार ३०८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, ११ लाख ४५ हजार ८८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत..जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितींच्या ११० गणांतील एकूण १६५ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने चोख तयारी केली आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रांमध्ये आदर्श मतदान केंद्रे, महिला मतदान केंद्रे, दिव्यांग मतदान केंद्रे तसेच युवा मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. .Local Body Elections: झेडपी, पंचायत समिती निवडणूक मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी.मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच अन्य मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ११ लाख ४५ हजार ८८९ मतदारांपैकी सहा लाख ५ हजार ८४३ पुरुष, पाच लाख ४० हजार ३८ महिला व अन्य आठ मतदारांचा समावेश आहे. तालुकानिहाय मतदान केंद्रांचा विचार करता धाराशिव तालुक्यात सर्वाधिक २७४, तर वाशी तालुक्यात सर्वात कमी ७३ मतदान केंद्रे आहेत. .Local Body Elections: तेरा तालुक्यांत आज मतदान .मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाहतुकीसाठी वाहनांची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळाची नेमणूकही करण्यात आली आहे. शनिवारी (ता.सात) सकाळी मतदान साहित्य संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना मतदान केंद्रांवर रवाना करण्यात येणार आहे. धाराशिव तालुक्यातील मतदान केंद्रांसाठी लागणारे साहित्य, साहित्य कक्षाच्या पथकाने पिशव्यांमध्ये भरून ठेवले असून, शुक्रवारी (ता. सहा) हे साहित्य संबंधित कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे..एकूण ६२७ उमेदवार रिंगणातदरम्यान, जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी एकूण २३४ उमेदवार, तर आठ पंचायत समितींच्या ११० जागांसाठी ३९३ उमेदवार रिंगणात असून, एकूण ६२७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर २७ जानेवारीपासून सर्व पक्षांचे नेते, उमेदवार व पदाधिकारी प्रचारासाठी गाव, वाडी, वस्ती व तांडे पिंजून काढत होते. गुरुवारी जाहीर प्रचार बंद झाला असून, ग्रामीण भागांतील या निवडणुकीसाठी काही राज्यस्तरीय नेत्यांच्याही सभा पार पडल्या. आता शनिवारी मतदारांचा कौल कुणाला मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..निवडणूक दृष्टिक्षेपातजिल्ह्यात एकूण एक हजार ३०८ मतदान केंद्रधाराशिव तालुक्यात सर्वाधिक २७४ मतदान केंद्रसर्वात कमी ७३ मतदान केंद्र वाशी तालुक्यातदिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, इतर सुविधापिण्याच्या पाण्यासह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.