Turmeric growers facing crisis: कारंजा तालुक्यात यंदा हळद लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असली तरी पावसाने दिलेल्या दगाफटक्यामुळे हळद उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. गेल्या काही वर्षांत हळदीला मिळालेला चांगला बाजारभाव, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू झालेली हळद लिलाव प्रक्रिया आणि नगदी पीक म्हणून वाढलेले महत्त्व यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा हळद लागवडीला प्राधान्य दिले. मात्र लागवडीनंतरच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून संपूर्ण लागवड क्षेत्रावर चिंतेचे सावट पसरले आहे..जूनच्या सुरुवातीला पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बियाणे खरेदी करून शेतांची मशागत केली आणि उपलब्ध सिंचन सुविधांच्या आधारे हळद लागवड पूर्ण केली. परंतु त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने हळदीच्या उगवणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकाला जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरी, बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे..Turmeric Cultivation: रिसोड तालुक्यात यंदा हळद लागवडीत वाढ होण्याची शक्यता.पावसाअभावी विहिरी, बोअरवेल आणि लहान-मोठ्या जलस्रोतांतील पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. हळद पिकासाठी वारंवार सिंचनाची आवश्यकता असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यावर मोठा ताण पडत आहे. काही भागांत विहिरींचे पाणी तळाला गेल्याने सिंचनासाठी अडचणी निर्माण होत असून शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे..Onion Farmers in Crisis: कांदा उत्पादक शेतकरी संकटात .यासोबतच ग्रामीण भागातील खंडित व कमी दाबाचा वीजपुरवठाही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे. अनेकदा रात्री उशिरा वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाऊन सिंचन करावे लागत आहे. मोटारी बंद पडणे आणि सिंचनाचे नियोजन विस्कळीत होणे या समस्याही वाढल्या आहेत..हळद हे खर्चिक आणि दीर्घकालीन पीक असल्याने बियाणे, खते, मजुरी व सिंचनावर मोठी गुंतवणूक करावी लागते. वेळेत पाऊस न झाल्यास उगवण कमी होणे, रोपे वाळणे आणि उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून लवकरच समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.