Sangli News: मसाले मंडळाच्या ३९ व्या स्थापना दिनानिमित्त ‘स्वच्छ आणि सुरक्षित मसाले’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत हळद पिकावरील विभागीय परिसंवाद गुरुवारी (ता. २६) सांगली बाजार समितीच्या चेंबर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती हळद केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी दिली..हा परिसंवाद केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय अंतर्गत मसाले मंडळ (मुंबई), महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज (सांगली) तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे..Turmeric Farming: हळदीतील कंदकुज, करपा पानावरील ठिपक्यांचे नियंत्रण.परिसंवादाचे उद्घाटन सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड अध्यक्षस्थानी असतील. .Turmeric Farming: हळदीवरील कंदमाशी आणि कंदसड रोखण्यासाठी तातडीची उपाययोजना.हळद संशोधन योजनेची उद्दिष्टे व कार्यपद्धती या विषयावर डॉ. श्रीमंत राठोड मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. मनोज माळी हे स्वच्छ, सुरक्षित व उच्च प्रतीचे हळद उत्पादन तसेच सुधारित शेती पद्धती याविषयी माहिती देतील..उपसंचालक (विकास) मसाले मंडळ, मुंबईचे सीमांत सैकिया सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत प्रमाणन प्रक्रिया, मसाले मंडळाचे धोरणात्मक उपक्रम, काढणीनंतरचे व्यवस्थापनातील हस्तक्षेप आणि विविध योजनांबाबत मार्गदर्शन करतील. तसेच सहायक संचालक (विपणन) डॉ. ममता धनकुटे या हळद निर्यातीसाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय निकष, अन्नसुरक्षा व गुणवत्ता मानके यावर सविस्तर माहिती देतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.