Tur Sold Below MSP In Andhra Pradesh: उत्पादनात घट आणि आता त्यात भाव कोसळल्याने आंध्र प्रदेशातील तूर उत्पादक (Tur Rate) शेतकरी चिंतेत आहेत. तुरीसाठी प्रतिक्विंटल ८ हजार रुपये किमान आधारभूत किंमत (MSP) असताना, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सुमारे ६,५०० रुपये भावाने तूर विकावी लागत आहे. हा दर हमीभावापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटलमागे १,५०० रुपयांचे नुकसान होत आहे. .२०२५-२६ मधील पीक हंगामात राज्यात सुमारे ७.९६ लाख एकरवर तूर पीक घेण्यात आले. हे पीक पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. जे बहुतांश कोरडवाहू भागात घेतले जाते. वर्षातून एकदाच त्याची पेरणी केली जाते. यामुळे हवामानातील चढउताराचा त्याला धोका पोहोचण्याची शक्यता अधिक असते. पीक काढणी काळात, स्थानिक बाजारात तुरीला प्रतिक्विंटल केवळ ६,५०० ते ६,६०० रुपये भाव मिळाल्याचे शेतकरी सांगतात. हा दर किमान आधारभूत किमतीपेक्षा खूपच कमी असल्याने नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे..तूर खरेदी केंद्रे वेळेत सुरु करण्यात आली नाहीत. जर खरेदी केंद्रे वेळेत सुरु करण्यात आली असती तर आम्हाला खासगी व्यापाऱ्यांकडे जाण्याची वेळ आली नसती. यात सरकार हस्तक्षेप करेल, अशी आशा होती. पण तसे काही झाली नाही. पण आम्हाला कर्जाची परतफेड करायची होती आणि त्यात शेतमाल साठवणूक सुविधा नव्हती, परिणाम आम्हाला शेतमाल तोट्यात विकावा लागल्याचे प्रकाशम जिल्ह्यातील शेतकरी सांगतात. .ICRISAT Tur Variety: कोणत्याही हंगामात उत्पादन घेऊ शकणारा तुरीचा वाण ठरणार गेमचेंजर?.शेजारील कर्नाटक सरकारने आधीच सरकारी खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. कर्नाटकात प्रतिक्विंटल ८ हजार रुपये हमीभावाने तूर खरेदी केला जात आहे. आंध्र प्रदेशातील बाजारात तुरीची आवक सुरू असताना खरेदी केंद्रे वेळेत सुरु केली असती तर खासगी व्यापाऱ्यांनी कमी किमतीत शेतमाल लागला नसता, अशी येथील शेतकऱ्यांची तक्रार आहे. .Tur Procurement: कर्नाटक, गुजरातमध्ये हमीभावाने तूर खरेदी.आंध्र प्रदेशातील अनंतपूर, प्रकाशम, कुरनूल, नंद्याल, पलनाडू आणि श्री सत्य साई आदी जिल्ह्यांत तूर पीक घेतले जाते. यंदा तूर उत्पादनात घट झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सुमारे १.७१ लाख टन उत्पादन झाले होते. या हंगामात उत्पादन १.१७ लाख टनांपर्यंत खाली घसरण्याचा अंदाज आहे. पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, प्रतिहेक्टर सरासरी उत्पादनात लक्षणीयरीत्या घट झाली आहे. गेल्या वर्षी उत्पादन प्रतिहेक्टर ४७३ किलोवरून ४०१ किलोपर्यंत खाली आले होते. .मक्याचीही हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीही चिंता केवळ तूर पिकापुरती मर्यादित नाही. मका उत्पादक शेतकऱ्यांनाही अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. मक्याची किमान आधारभूत किमत प्रतिक्विंटल २,४०० रुपये असताना राज्यातील शेतकरी १,५०० ते १,९०० रुपये भावाने मका विकत असल्याचे दिसून आले आहे. सरकारने खरेदी केंद्रे सुरु केली असली तरी, शेजारच्या तेलंगणामधून मोठ्या प्रमाणात मक्याची खरेदी केला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.