Pune News: हमीभावाने तूर खरेदीसाठी अखेर २० जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. यंदा सोयाबीन खरेदीसाठी ९३४ खरेदी केंद्रे असणार आहेत. दुसरीकडे भावातही सुधारणा दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा हमीभावाच्या खाली तुरीची विक्री करू नये, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे. तुरीचा बाजार मागील वर्षभर दबावातच होता. मात्र डिसेंबरपासून भावात काहीशी सुधारणा दिसून आली. देशातील तुरीचे उत्पादन यंदाही कमीच राहण्याची शक्यता आहे. .सरकारने ३६ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज दिला आहे. तर उद्योगांच्या मते, २८ ते ३० लाख टनांच्या दरम्यान उत्पादन राहील. देशातील कमी झालेले उत्पादन आणि भाव कमी असल्यामुळे कमी झालेली आयात यामुळे दरात सुधारणा दिसून आली आहे. सध्या बाजारभाव ७००० ते ७३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. काही बाजारात सरासरी भाव ७५०० रुपयांपर्यंतही पोहोचला आहे..MSP Tur Procurement : हमीभावाने ४० हजार ९०१ क्विंटल तूर खरेदी.बाजारातील आवक सुधारत आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावरही दबाव येण्याची शक्यता होती. पण सरकारने आता तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे. यामुळे तूर बाजारालाही आधार मिळणार आहे. यंदा सरकारने तुरीला प्रति क्विंटल ८ हजार हमीभाव जाहीर केला आहे. सरकारने अद्याप खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केले नाही. मात्र, सरकार यंदा पूर्ण तूर विकत घेईल, अशी चर्चा खरेदी प्रक्रिया राबवणाऱ्या संस्थांमध्ये सुरू आहे..कृषी विभागाने जाहीर केलेली तुरीची उत्पादकता (प्रति हेक्टरी, क्विंटलमध्ये)वर्धा १६.५५, लातूर १५, चंद्रपूर १४.५०, सांगली १४.३६, अकोला १४, अमरावती १२.९०, गडचिरोली १२.६६, यवतमाळ १२.६०, हिंगोली १२.६०, जळगाव ११, बुलडाणा ११.१०, जालना ११, जळगाव ११, नांदेड ९.५०, बीड ९.५०, वाशीम ९.४०, अहिल्यानगर ९, सोलापूर ८.१२, छत्रपती संभाजीनगर ८.४१, धुळे ८.५०, सोलापूर ८.१२, नागपूर ८, गोंदिया ७.५०, भंडारा ६, सातारा ७, कोल्हापूर जिल्ह्यात ६.७० क्विंटल उत्पादकता जाहीर केली आहे..Tur MSP Procurement: अखेर तूर हमीभावाने खरेदीला परवानगी; राज्यात हमीभावाने २ लाख ९७ हजार टन तूर खरेदी होणार.हमीभावाच्या खाली विक्री नकोसरकार यंदा तुरीची खरेदी वाढवणार हे स्पष्ट आहे. कारण ज्या केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू आहे, त्या केंद्रांवरच तुरीची खरेदी होणार आहे. यंदा तूर खरेदीसाठी ९३४ केंद्रे सुरू आहेत. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर हमीभावाने विक्रीसाठी तातडीने नोंदणी करून ठेवावी. तुरीची हमीभावापेक्षा कमी भावात विक्री टाळावी, असे आवाहनही अभ्यासकांनी केले आहे. हमीभावाने खरेदी वाढल्यानंतर खुल्या बाजारातही भाव वाढण्याची शक्यता आहे. मार्चपर्यंत बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता असल्याचेही अभ्यासकांनी सांगितले आहे..देशात यंदा उत्पादन कमी आहे. कमी भावात आयातही मंदावली आहे. यामुळे भावात सुधारणा दिसत आहे. आता सरकार हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाच्या खाली तूर विकू नये. एप्रिलपर्यंत तुरीच्या भावात चांगली सुधारणा दिसू शकते.- दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्लेषक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.