Akola News: अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तूर, तसेच कापसाच्या दरात तेजी दिसून येत आहे. या बाजारात कापूस ८५०० रुपयांवर पोहोचला, तर तुरीचीही कमाल ८,९०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री झाली. या दोन्ही प्रमुख पिकांची आवकही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तुरीची सुमारे २,९५० क्विंटल आणि कापसाची ३५०० क्विंटल आवक झाली आहे..तुरीच्या दरवाढीमागे यावर्षी उत्पादन कमी झाल्याचे कारण दिले जात आहे. नवीन हंगामाची सुरुवात होताच तुरीच्या भावात वाढीकडे कल दिसू लागला. मंगळवारी (ता. २७) या बाजारात तुरीची किमान किंमत ७,३७५ रुपये, तर कमाल ८९०० रुपये प्रति क्विंटल नोंदवली गेली..Soybean, Cotton, Tur Price : सोयाबीन, कापूस, तुरीत किंमतवाढीचा कल.कापसाच्या दरातही वाढ सुरू आहे. अकोट येथील कापूस व्यावसायिकांच्या मते, कापसाचा दर ८ हजार ते ८५३५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे. केंद्र सरकारने १ जानेवारीपासून कापसावर ११ टक्के आयात शुल्क पूर्ववत केल्यामुळे देशांतर्गत बाजारात किमतीत वाढ झाली असून, सरकीच्या दरातही तेजी जाणवली आहे. सध्या सरकीचे दर ४५०० ते ४५५० रुपये प्रति क्विंटल आहेत..Tur Price: तुरीचे दर कमीच; तसेच काय आहेत सोयाबीन, कापूस, पपई आणि दोडक्याचे आजचे बाजारभाव .येथे जिनिंग प्रेस उद्योगात कापसातून सरकी वेगळी करून रुई तयार केली जाते. ही रुई देशी तसेच आंतरदेशीय बाजारात विकली जाते. बाजारातील या हालचालींमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, भाव अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे..कापूस भाववाढीची कारणेअकोटमध्ये कापसाची मोठी आवक असल्यामुळे मागणीत वाढ, पुरवठ्यातील तुटवडा, सरकारी खरेदी आणि रुई-सरकीच्या दरातील सुधारणा यामुळे भाव वाढले आहेत. विशेषतः कापड उद्योगासाठी उपयुक्त असणाऱ्या लांब धाग्याच्या आणि शुभ्र पांढऱ्या कापसाची मागणी जास्त आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.