Nagpur News: वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कथित भ्रष्टाचाराबाबत लक्षवेधी सूचना दाखल केल्यानंतर धमकी दिल्याचा आरोप नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मंगळवारी (ता. ९) विधानसभेत केला. तसेच मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार गोंधळ घालत विधानसभेचे कामकाज बंद पाडले..दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांनी दिलेल्या धमकीची चौकशी केली जाईल, तसेच त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही चौकशी करून सभागृहाला माहिती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर वादावर पडदा पडला..Agriculture Department Corruption: आठ हजारांची लाच घेणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याला अटक.भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी आरोप केला, की २०२० मध्ये मुंढे यांनी आयुक्त असताना २० कोटी रुपयांचे धनादेश दिले होते. मुंढे यांच्या दोन समर्थकांनी, त्यांच्याविरुद्ध बोलू नका, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी दिली. मी सीताबर्डी पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार दाखल केली आहे आणि पोलिस आयुक्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला कळवले आहे. मुंढे यांच्या २० वर्षांच्या सेवेत या अधिकाऱ्याची २४ वेळा बदली करण्यात आली आहे. त्यांच्या वर्तनाची सविस्तर चौकशी करावी.’’.भाजपचे आणखी एक आमदार प्रवीण दटके यांनी खोपडे यांच्या दाव्याचे समर्थन केले. ते म्हटले, ‘‘मुंढे यांनी पाच दिवसांपूर्वीच एका महिला कर्मचाऱ्याला बाळंतपणात रजा रद्द केली होती. नगरविकास विभागानेही त्यांचे अनेक निर्णय रद्द केले आहेत. याची सखोल चौकशी झाली पाहिजे.’’.या आरोपांना उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहाला सांगितले, ‘‘संबंधित आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी या विषयावर आधीच चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल.’’ मात्र सत्ताधारी आमदार कारवाईसाठी आग्रही राहिले, त्यामुळे गोंधळ वाढला. परिणामी, उपसभापती अण्णा बनसोडे यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर, खोपडे आणि दटके यांनी त्वरित कारवाईची मागणी लावून धरली..Agriculture Department Corruption: कृषी अधिकाऱ्यांच्या खासगी कंपन्यांची चौकशी ‘एसीबी’कडे .चर्चेत हस्तक्षेप करत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘मुंढे यांची यापूर्वी अनेकदा चौकशी झाली होती, परंतु त्यांना कधीही दोषी ठरविण्यात आले नाही. २१ बदल्या होऊनही, एकाही चौकशीत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले नाहीत. राष्ट्रीय महिला आयोगालाही गैरकृत्य आढळले नाही. उलट, त्यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र यांच्या हस्तक्षेपला आक्षेप घेत सत्ताधारी आमदारांनी कारवाईची मागणी केली..मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नंतर हस्तक्षेप करत सांगितले, ‘‘सरकार सर्व पैलूंची तपासणी करेल. आमदाराला धमकी देणे अयोग्य आहे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यप्रणालीबाबत तक्रारी आहेत. याची सखोल चौकशी केली जाईल आणि सभागृहाला कळवले जाईल.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.