Washington News: इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनेई हे इस्राईलच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर हे युद्ध किती काळ चालेल, या बाबतचा अंदाज वर्तविला जात असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘हे युद्ध चार ते पाच आठवडे चालू शकेल’ असे सांगितले आहे..तसेच इराणबरोबर दीर्घकाळ युद्ध करण्याचीही अमेरिकेची क्षमता असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि इस्राईलकडून इराणवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरूच असून हल्ल्यांसाठी अमेरिकेने ‘बी १२’ बाँबर विमानाचा वापर सुरू केला आहे. इराणकडूनही प्रतिहल्ले सुरू असल्याने युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने आज इस्राईलवर आणि काही आखाती देशांमध्ये हल्ले केले..Trump Tarrif Policy: दंडेलशाहीची हद्द.तसेच होर्मूझची सामुद्रधुनी बंद करत आंतरराष्ट्रीय तेलव्यापारातही अडथळे निर्माण केले आहेत. अमेरिकेचे एक जेट विमानही पाडल्याचा दावा इराणने केला आहे. इराणने प्रामुख्याने इस्राईलमधील तेल अवीवला लक्ष्य केले आहे. इराणच्या हल्ल्यात तेल अवीवमधील काही इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे..अमेरिका आणि इस्राईलनेही क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच ठेवला असून, इराणची राजधानी तेहरानमध्ये सोमवारी रात्रीपासूनच हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. इराण आणि अमेरिका चर्चेस तयार नसल्याने आणि ट्रम्प यांनी हे युद्ध दीर्घकाळ सुरू ठेवण्याची तयारी दर्शविल्याने संघर्ष लांबण्याची शक्यता आहे..इस्राईलने सोमवारी रात्री उशिरा इराणच्या अध्यक्षीय कार्यालयावर आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या इमारतीवर क्षेपणास्त्रांचा मारा करत या दोन्ही इमारती उद्ध्वस्त केल्या. याशिवाय, इराणच्या सैन्याचे प्रशिक्षण केंद्र आणि इतर महत्त्वाच्या इमारतींनाही लक्ष्य करण्यात आले. शनिवारपासून इराणवर झालेल्या हल्ल्यात ७८७ जणांचा मृत्यू झाल्याचे इराणच्या ‘रेड क्रिसेंट सोसायटी’ने सांगितले..Israel Iran conflict: इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला; इराणमध्ये आणीबाणी, मध्यपूर्वेतील तणाव तीव्र.दरम्यान, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या नेतृत्व समितीमध्ये निवड झालेले आणि संभाव्य सर्वोच्च प्रमुख अलीरेझा अराफी यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची शंका काही वृत्त वाहिन्यांनी व्यक्त केली होती. मात्र अराफी यांनी आज व्हिडिओ संदेश जारी करत सूडाचा निश्चय पुन्हा एकदा व्यक्त केला..लेबनॉनमध्येही माराइराणचे पाठबळ असलेल्या हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेनेही इस्राईलवर हल्ले सुरू केले असून, इस्राईलकडूनही प्रतिहल्ले होत आहेत. इस्राईलने आज लेबनॉनच्या दक्षिण भागामध्ये जोरदार हवाई मारा केला..चीनचे आवाहनआखाती देशांमधून तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करणाऱ्या चीनला युद्धामुळे फटका बसत आहे. हे युद्ध तातडीने थांबवावे आणि होर्मूझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांना सुरक्षितपणे वाहतूक करू दिली जावी, असे आवाहन चीनने केले आहे. इराणने सर्व तेलमार्गांवर हल्ले सुरू केले असल्याने तेल व्यापाराचे मोठे नुकसान होत आहे..ठळक घडामोडीइस्राईलच्या हल्ल्यात इराणमधील ऐतिहासिक गोलिस्तान पॅलेसची पडझडइराणमधील अध्यक्षीय कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची इमारत उद्ध्वस्तइराणने कुवेतमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे सहा सैनिक ठारहल्ल्यांसाठी अमेरिकेकडून बी-१२ बाँबर विमानाचा वापरइराणमधील शाळेवरील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १६८ मुलींवर अंत्यसंस्कारअमेरिकेत होणाऱ्या फुटबॉल विश्वकरंडकासाठी इराणचा संघ पात्र, मात्र सहभाग अनिश्चितआखाती देशांमधील ब्रिटनच्या तळांवरही इराणकडून हल्ले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.