Agri Women Respect: शेतात उभी असलेली उंच ज्वारीची ताटे, भरलेली कणसे पाहिल्यावर एखाद्या वाटसरूने विचारले, ‘‘कुणाचे आहे हे शेत?’’ तर उत्तर मिळे ‘‘भामा आजीचे.’’ वास्तविक शेत दुसऱ्याचे असे पण त्यास आजीची सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली होती म्हणून ती कृतज्ञता. हा खरा स्त्री सन्मान!