Maharashtra Monsoon Update: अरबी समुद्रावर तयार होत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागात मंगळवारी (ता. ७) ढगफुटीसदृश पावसाची दाट शक्यता आहे. विशेषतः त्र्यंबकेश्वर आणि परिसरात सुमारे ३०० मिलिमीटर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.६) येथे दिली. .राज्याच्या किनारी भागातील जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ७० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. समुद्राला भरती असल्याने सर्व यंत्रणांनी चोवीस तास दक्ष राहावे..Maharashtra Rain Alert: अतिवृष्टीने हाहाकार, आज जोरदार वारे वाहणार, लोकांनी सजग राहावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन, विधानसभेचे कामकाज स्थगित.राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मंगळवारीही (ता.७) अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला, त्या वेळी ते बोलत होते..Maharashtra Rain Update: राज्यात पावसाने जनजीवन विस्कळीत, इंद्रायणीला पूर, रायगडमधील ४ नद्यांनी ओलांडली धोका पातळी.आळंदीतून ४०० भाविकांना हलविलेइंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदीत अडकलेल्या ४०० भाविकांची सुटका करण्यात आली. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये, त्याऐवजी वारकऱ्यांनी थेट पुण्यात यावे’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे..आळंदीतून ४०० भाविकांना हलविलेइंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदीत अडकलेल्या ४०० भाविकांची सुटका करण्यात आली. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये, त्याऐवजी वारकऱ्यांनी थेट पुण्यात यावे’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.