Trimbakeshwar Weather Update: नाशिक जिल्ह्यात विशेषतः त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, सिन्नर आणि नाशिक तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून, मंगळवारी (ता. ७) सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत दहाडेवाडी येथे १७० मिमी, त्र्यंबकेश्वर येथे १६६ मिमी, अभोणा येथे ६८ मिमी आणि वावी येथे ६६ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, जिल्ह्यात कुठेही ढगफुटीसदृश पाऊस झालेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली..त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतिवृष्टी, तर पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. पूरस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून इगतपुरी येथे एसडीआरएफचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी करून यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या..Rain Andaj : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; मध्य महाराष्ट्र, विदर्भातही पावसाचा अंदाज.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यात दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ‘भाबडबारी घाट’ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर आणि वणी येथील श्री सप्तशृंग देवी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले असून, जिल्ह्यातील धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ आणि पूरप्रवण धार्मिक स्थळांवर पर्यटकांना पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पंचवटीतील रामकुंड परिसरातही प्रशासनाने खबरदारी घेतली आहे..Maharashtra Heavy Rainfall: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार शक्य.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा आणि नाशिक ग्रामीण तालुक्यांतील शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सर्व आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि मोठे सार्वजनिक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहेत..अतिवृष्टी झालेली महसूल मंडले (मिमी) :दहाडेवाडी : १७०त्र्यंबकेश्वर : १६६,अभोणा : ६८वावी : ६६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.