गौरव जोशी : सकाळ वृत्तसेवाTribal Development: राज्यातील पात्र वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे आदिवासी बांधवांना पीककर्ज, विविध शासकीय योजना, पीकविमा तसेच नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ३३ हजार ३९० वनपट्टेधारक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे..देशाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासी बांधवांना उपजीविकेसाठी वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, सातबाऱ्यावर वनविभागाचे नाव कायम राहून लाभार्थ्यांची नावे इतर हक्कांमध्ये नोंदविण्यात आल्याने या शेतकऱ्यांना अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत होते. शेती असूनही पीककर्ज, पीकविमा किंवा अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळत नव्हती. परिणामी शासनाबद्दल नाराजीची भावना निर्माण झाली होती..Farmer Relief: जमिनी खरडून गेलेल्या २० हजार बाधितांसाठी ५७ कोटींचा निधी .या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांनी गतवर्षी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा ठामपणे मांडला होता. त्यानंतर शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून पात्र वनपट्टेधारकांची ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील १ लाख १ हजार ५२७ वनपट्टेधारकांपैकी ९२ हजार ४७३ जण पात्र ठरले असून त्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. संबंधित नोंदणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून शासनाने कार्यपद्धतीही निश्चित केली आहे. या निर्णयामुळे आदिवासी शेतकऱ्यांना पीककर्जासह विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार असून, वर्षानुवर्षे सुविधांपासून वंचित राहिलेल्या या घटकाच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे..Farmer Relief: अकरा शेतकऱ्यांना १ कोटी ६ लाखांची मदत.अपात्र दाव्यांची पुनर्पडताळणी सुरूदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या २०२५ मधील आदेशानुसार अपात्र ठरलेल्या दाव्यांची पुनर्पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी संबंधित आदिवासी बांधवांना जिल्हास्तरीय समितीकडून पाचारण करण्यात आले होते. आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेकांनी मोठ्या कष्टाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ती समितीसमोर सादर केली आहे..२५ हजार ५७३ दावे अपात्रवनहक्क कायदा २००६ लागू झाल्यापासून जिल्ह्यात एकूण ६० हजार ७४ दावे दाखल झाले होते. जिल्हास्तरीय समितीने पडताळणीनंतर ३३ हजार ३९० दावे पात्र ठरविले, तर २५ हजार ५७३ दावे अपात्र घोषित केले. पात्र लाभार्थ्यांना २१ हजार ५७४ हेक्टर क्षेत्र वितरित करण्यात आले असून हे सर्व शेतकरी आता ॲग्रीस्टॅकच्या कक्षेत येणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.