Solapur News: विजापूर रोडवरील सिद्धेश्वर वनविहारात जाळरेषा तयार करताना रविवारी (तर.१८) काही झाडे जळाल्याचे निदर्शनास आले. वनक्षेत्रात आग पसरू नये म्हणून जाळरेषा तयार करताना जाळ रेषेबाहेरील काही झाडे जळाली आहेत. .वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या राखीव जंगलात आग लागू नये, यासाठी जाळरेषा काढल्या जातात. कोणी जळती सिगारेट किंवा विस्तव असलेला कचरा टाकल्यास संपूर्ण जंगल आगीच्या भक्षस्थानी पडू नये, यासाठी या जाळरेषा उपयुक्त ठरतात. त्यामुळे वन विभागाकडून दरवर्षी अशा जाळरेषा काढल्या जातात..Mango Tree Burnt : ऐन बहरात शेकडो आंब्याची झाडे खाक.सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील सिद्धेश्वर वनविहार या राखीव जंगलात रविवारी (ता. १८) जाळरेषा काढण्यात आल्या. मात्र, या जाळरेषा किमान तीन ते सहा मीटरच रुंदीच्या काढणे आवश्यक होते. .Madura Fire: मडुरा येथे आगीत काजूची ५०० झाडे जळाली.प्रत्यक्षात त्याहून अधिक मोठ्या जाळरेषा काढल्याने ही आग रेषेच्या बाहेरदेखील काही प्रमाणात पसरल्याचे दिसून आले. यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे जळाल्याचे दिसून येत आहे..सिद्धेश्वर वनविहाराच्या बाहेरील बाजूस, तारेच्या कुंपणापलीकडेही वनक्षेत्र जळाल्याचे दिसत असून काही मोठी झाडे आडवी पडलेली दिसत आहेत. जाळरेषेच्या मर्यादेपेक्षा अधिक क्षेत्रात आग पसरल्याचे चित्र समोर आले आहे. या घटनेमुळे जाळरेषा शास्त्रीय पद्धतीने काढाव्यात, तसेच वनक्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.