Hingoli News: मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी पाच गावांमध्ये एकूण २२ किलोमीटर शेत व पाणंद रस्त्यांची कामे सुरू आहेत. शेत रस्त्यांच्या कामांमुळे शेतकऱ्यांना थेट बांधापर्यंत पोहोचणे सोपे होईल. शेतीमाल वाहतूक करणे सुलभ होईल. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे ४७५.९६ कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित ई-केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांनी तत्काळ प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले..हिंगोली येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर सोमवारी (ता. २६) प्रजासत्ताक दिन ध्वजवंदन कार्यक्रमात श्री. झिरवाळ बोलत होते. या वेळी आमदार सर्वश्री तानाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलिस अधीक्षक नीलभ रोहण आदींसह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते..Farm Roads: पाणंद, शेतरस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा.श्री. झिरवाळ म्हणाले, ‘‘ॲग्रीस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांकामुळे कृषी योजनांचा लाभ अधिक सुलभ झाला आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून सिंचनासाठी ७४७ शेतकऱ्यांना १.५० कोटी रुपये तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून २७८ शेतकऱ्यांना १.४१ कोटी रुपये अनुदान वितरित केले..Farm Roads: धाराशिव जिल्हा नियोजन समितीकडून ३२१ रस्त्यांसाठी निधी.कृषी यांत्रिकीकरणासाठी ४४१ कोटी रुपये खर्च करण्यात आला. ‘संजीवनी अभियाना’अंतर्गत जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड मिळाला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून २ हजार ६७६ युवकांना प्रशिक्षण देऊन २३.७१ कोटी रुपये विद्यावेतन देण्यात आले. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १ हजार १४५ लाभार्थ्यांना ८६ कोटी रुपये कर्ज मंजूर असून व्याज परतावा थेट खात्यावर जमा करण्यात आला. .महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत १५ हजारांहून अधिक महिलांचे बचत गटांच्या माध्यमातून संघटन झाले असून, उद्योग व रोजगारासाठी कोट्यवधी रुपये कर्ज वितरित करण्यात आले. ‘सेवादूत हिंगोली’वेब प्रणाली, व्हॉट्सॲप चॅटबोट (९४०३५५९४९४) व ‘से हाय टू कलेक्टर’ (८५४५० ८५४५०) या प्रणालींमुळे नागरिकांच्या तक्रारींचे जलद, पारदर्शक व सुलभ निराकरण होत आहे. डीएम डॅशबोर्डद्वारे सर्व विभागांची माहिती एकत्रित उपलब्ध करून देत आहे. ग्रामीण रोजगार हमी योजना व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांद्वारे दुर्बल घटकांना मोठा आधार मिळत आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.