Nashik News: ग्रामपंचायत प्रशासन हे ग्रामीण विकासाचे मुख्य आधारस्तंभ आहे. प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने व लोकसहभाग वाढवून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे हे सन्मानचिन्ह इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. जिल्हा प्रशासन ग्रामपातळीवरील उत्कृष्टता अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने योगदान देत राहील, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले. .जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभागातर्फे आयोजित ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी (ता. १९) जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या वेळी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना तसेच १ विस्तार अधिकारी (पंचायत) या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले..WINDS Project: ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्रे उभारणार.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामीण विकासाचा कणा असून प्रत्येक अभियानात त्यांची भूमिका व काम महत्त्वाचे आहे. ते नियोजनबद्ध काम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात करत आहे. त्यामुळे सर्वजण यात यशस्वी होतील व त्याचा जिल्हा परिषद व पंचायत समिती गुणांकनासाठी निश्चितपणे उपयोग होईल, असे मत या वेळी व्यक्त केले..यांचा झाला सन्मान‘आदर्श विस्तार अधिकारी (पंचायत) २०२४-२५’ ः राजेंद्र सयाजी पाटीलआदर्श ग्रामपंचायत अधिकारी :तालुका...पुरस्कारार्थी(कंसात गाव)नाशिक...रंगनाथ संतोष मोरे(महादेवपूर).इगतपुरी...रूपाली नामदेव जाधव(भावली खु.)त्र्यंबकेश्वर...चंद्रकांत विठ्ठल कातुरे(देवळा आ)पेठ...गौतम आनंदा चव्हाण(रुईपेठा)सुरगाणा...गणेश रामजी गावित(पोहळी)दिंडोरी...रामदास वामण मोरे(महाजे).Rural Development: ग्राम विकासात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोठे योगदान: प्रतापराव जाधव .कळवण...हेमलता आनंदा पगार(ओझर)बागलाण...कैलास सोदरसिंग राठोड(सोमपुर)देवळा...वसंत गोविंदा भामरे(सावकी लो. )चांदवड...संदीप हरी पवार(शिंदे).मालेगाव...वैशाली बाळासाहेब खैरनार(येसगाव खु. )नांदगाव...संतोष रघुनाथ बैरागी(जामदरी)येवला...भगवान भाऊसाहेब गायके(उंदिरवाडी व खिर्डीसाठे)निफाड...सोनाली रामनाथ सांगळे(वडाळी नजीक)सिन्नर...संजू माधव बेनाडे(ठाणगाव).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.