Electricity Transformer Theft Investigation: विद्युत रोहित्र (डीपी) फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेणाऱ्या चोरट्यांच्या टोळीतील दोघांना शिरूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. या टोळीने डीपी चोरीचे १८ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीच्या ३०० किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या..संतोष बारकू भालेराव व किरण गोविंद खंडागळे (दोघे रा. जऊळके बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, शिरूर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या दोघांमागे डीपी चोरांची मोठी टोळी असण्याची शक्यता असून, त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवून या टोळीचा पर्दाफाश केला जाईल, असा विश्वास शिरूरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी व्यक्त केला..Agricultural Pump Cable Theft: केबल जाळून त्यातील कॉपर वायर लंपास .शिरूर तालुक्यात, विशेषतः तालुक्याच्या बेट भागात, डीपी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेण्याचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू होते..या प्रकारामुळे संबंधित डीपीवर आधारित परिसरातील वीजपुरवठा खंडित होत असून, सामान्य नागरिकांचे हाल होत होते. उभ्या पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतीचे नुकसान होत होते. तसेच उद्योगधंद्यांनाही वीजपुरवठ्याअभावी फटका बसत होता. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले..Agricultural Pump Cable Theft: केबल जाळून त्यातील कॉपर वायर लंपास .या पार्श्वभूमीवर गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार शरद वारे, अक्षय कळमकर, विजय शिंदे, निखिल रावडे, नीतेश थोरात, नीरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, वैभव शेलार, रवींद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांच्या पथकाने डीपी चोरांचा शोध घेण्यासाठी गेल्या काही दिवसांत ठिकठिकाणी सापळे लावले..तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या गुप्त माहितीवरून संतोष भालेराव व किरण खंडागळे यांना आज सायंकाळी शहरातील हुडको परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अण्णापूर येथे १ जानेवारी रोजी झालेल्या डीपी चोरीची कबुली दिली. त्यानंतर आणखी चौकशी केली असता त्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत डीपी चोरीचे १८ गुन्हे केल्याची कबुली दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.