Beed News: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे नुकतेच मका पीक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण पार पडले. विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी या प्रशिक्षणाला हजेरी लावून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले..प्रशिक्षणाचे प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य दादासाहेब झांजे यांनी केले. त्यांनी कांदा चाळीला अनुदान तुटपंज आहे. कारण खर्च मर्यादा चार लाखवरील असल्यामुळे जीएसटी रक्कम ६० ते ७० टक्के अनुदानाची जात असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळ कृषी अधिकारी ए. एस. भापकर यांनी मका पिकाबाबत जोडवळ पद्धत, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक खत व्यवस्थापन याबाबत सखोल व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले..Maize Crop Management: मका पिकात अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे.यावेळी संकल्प महिला कृषी उद्योजक गट, पारोडी यांच्या माध्यमातून सारिका सायंबर यांनी तयार केलेल्या जैविक औषधांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. जैविक शेतीत या औषधांचा वापर कसा करावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन सर्व योजनांची सांगड घालून शेती करावी, असे आवाहन केले..E-Crop Survey Training : बांधावर जाऊन ई-पीक पाहणीचे मार्गदर्शन.कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे ते म्हणाले. विभागीय कृषी सहसंचालक श्री. वानखेडे यांनी गुणवत्तापूर्वक कांदा लागवड, साठवणूक, निर्यात प्रक्रिया, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग व नैसर्गिक शेती बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले..१२ ट्रॅक्टरची मोका तपासणीविभागीय कृषी सहसंचालक श्री. वानखेडे यांनी यावेळी सामूहिकरीत्या १२ ट्रॅक्टरची मोका तपासणी केली.सर्व ट्रॅक्टर घेतलेल्या लाभार्थ्याबरोबर त्यांनी चर्चाही केली. यावेळी ड्रोन पायलट शैलेश कवडे यांनी कृषी विभागाच्या अनुदानावर घेतलेल्या ड्रोनचे प्रात्यक्षिक सर्व शेतकऱ्यांना दाखवण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.