Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयातील सामायिक उष्मायन केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. १९) व शनिवारी (ता. २०) परभणी जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील महिला बचत गटांसाठी अन्नप्रक्रिया प्रशिक्षण घेण्यात आले..अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा होते. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, प्रशिक्षण समन्वयक डॉ. विजया पवार, परभणीचे तालुका कृषी अधिकारी विजयकुमार नांदे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पी. पी. रेंगे (परभणी), एस. यू. हूगे (सेलू), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके आदी उपस्थित होते..Micro food processing industry : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सांगली जिल्हा राज्यात अव्वल ; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार; ५३८ उद्योगांना मंजुरी.डॉ. इंद्रमणी म्हणाले, ‘‘शेतापासून थेट ग्राहकापर्यंत प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित अन्नपदार्थ पोहोचविण्यासाठी मजबूत व शाश्वत पुरवठा साखळी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठ व आत्मा यांना एकत्र येऊन मॉडेल तयार करावे लागेल.’’.Food Processing Industry Subsidy : अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळणार तीन कोटींपर्यंत अनुदान.चव्हाण म्हणाले, ‘‘प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या बाजारपेठेची व्याप्ती मोठी असून या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत.’’ महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..या प्रशिक्षणात आवळा, केळी व सोयाबीन यांपासून विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित अन्नपदार्थ त्यात आवळा मुरंबा, आवळा लोणचे, केळीचे चिप्स, केळीची पावडर, सोयाबीन स्नॅक्स आदींचे करण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.