Palghar News: डहाणू तालुक्याच्या किनारी आणि ग्रामीण भागात भंडारी व आदिवासी समाजाचा पारंपरिक ताडी-विक्री व्यवसाय सध्या शासकीय धोरणे आणि वाढत्या स्पर्धेमुळे संकटात आला आहे. परवाना प्रक्रियेतील गुंतागुंत आणि उत्पादन शुल्क विभागाचे निर्बंध यामुळे अनेक भूमिपुत्रांना त्यांचा पिढीजात व्यवसाय सोडून इतर रोजगाराच्या शोधात जावे लागत आहे..पूर्वी ताडी गोळा करणे, बाटलीबंद करणे आणि स्थानिक विक्रीमुळे जगला स्वरोजगार उपलब्ध होत होता. ठाणे व पालघर जिल्ह्यांत २०-२२ वर्षांपूर्वी सुमारे ५००हून अधिक अधिकृत परवानाधारक ताडी विक्रेते होते. .Export Award: निर्यातेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला आठ पारितोषिके.आज डहाणू आणि तलासरी तालुक्यात ही संख्या फक्त ३० पर्यंत आहे. उत्पादन शुल्क अधिकारी सुनील देशमुख यांच्या माहितीनुसार, सध्या लोकसंख्येनुसार अधिकृत परवाना मिळवण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये लागतात. तसेच, डहाणू, तलासरी परिसरात २०० हून अधिक बिअर शॉपमुळे ताडी विक्री दुकाने कमीझाले आहे..Fishing Policy: मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर गदा.अट शिथिल करावीया व्यवसायासाठी ताड आणि खजुराची झाडे लिलावातून मिळवावी लागतात, ज्यासाठी वार्षिक ४०० ते ५०० रुपये द्यावे लागतात; परंतु आता लिलाव व परवाना प्रक्रिया अतिशय किचकट झाल्याने अनेक ठिकाणी गुपचूप ताडी विक्री करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब दिसतात. .शासनाने परवाना प्रक्रिया शिथिल करावी, जेणेकरून हा पारंपरिक व्यवसाय पुन्हा उभा राहील आणि स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल, अशी मागणी ताडी विक्रेते करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.