Jejuri News: फटाक्यांचा निनाद, शोभेच्या दारूची आतषबाजी, खंडोबाचा जयघोष, सनई चौघड्याचा मंगलमय सूर अशा उत्साही वातावरणात कडेपठारच्या डोंगररांगेतील रमणा परिसरात देवभेटीचा सोहळा गुरुवारी (ता. २) मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास रंगला. कडेपठारच्या डोंगररांना जागविणाऱ्या मर्दानी दसऱ्याची शुक्रवारी (ता. ३) दुपारी बारा वाजता सांगता झाली. सुमारे अठरा तास दसरा उत्सव सुरू होता..गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पेशव्यांनी इशारा देताच गडावरची पालखी उचलण्यात आली. या वेळी इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त पोपटराव खोमणे, अनिल सौंदडे, ॲड. पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. विश्वास पानसे, व्यवस्थापक आशिष बाठे आदी उपस्थित होते..Farmers Dussehra 2025: खरे सीमोल्लंघन.पालखीची मंदिर प्रदक्षिणा सुरू असताना भाविकांनी मुक्तपणे भंडाऱ्याची उधळण केली. भंडाऱ्यामुळे गड सोनेरी दिसत होता. मुख्य दरवाजातून पालखी सुसरटिंगी येथे आणण्यात आली. रात्री नऊ वाजता कडेपठारची पालखीचे प्रस्थान झाले. रात्री दोन वाजता कडेपठराच्या डोंगरात दोन्ही पालख्यांतील उत्सवमूर्तींची भेटाभेट झाली..Auspicious Bird On Dussehra : दसऱ्याच्या दिवशी कोणता पक्षी पाहणे शुभ ठरेल?.त्या वेळी शोभेच्या दारूची आतषबाजी, आकाशात उडणारे रंगीबेरंगी फटाके अशा जल्लोषपूर्ण वातावरणात खंडोबाचा जयघोष करीत देवभेटीचा सोहळा चांगलाच रंगला. ग्रामस्थांनी एकमेकांना भेटून सोने लुटले..दरम्यान, जेजुरी गडावर शुक्रवारी (ता. ३) सकाळी आठ वाजता खंडा उचलण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये एका हाताने तलवार उचलून धरण्याच्या स्पर्धेत रमेश शेरे यांनी, तर कसरतीच्या व्यायाम प्रकारात नितीन कुदळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विजयी स्पर्धकांना बक्षीस रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.