Safe Crop Weeding : पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतातील ओलावा कमी झाला, तणांचा प्रादुर्भाव वाढला आणि पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी तणांचा विळखा कायम असल्याने शेतकरी बैलजोडीच्या साह्याने सोयाबीनची डवरणीवर भर देत आहेत..पावसाच्या खंडामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसताना तणनाशकांची फवारणी प्रभावी ठरत नव्हती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रसामग्रीऐवजी पारंपरिक पद्धतीचा आधार घेत बैलजोडीने डवरणी सुरू केली. आता पावसानंतर शेतातील ओलावा वाढल्याने डवरणीच्या कामांना अधिक वेग आला असून महागाव परिसरातील अनेक शेतांमध्ये बैलजोडीची लगबग पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे स्वतःची बैलजोडी नसल्याने त्यांना भाड्याने बैल आणावे लागत आहेत. त्यामुळे डवरणीचा खर्च वाढला आहे..Farm Irrigation: पावसाच्या दडीमुळे पिकांना तुषार सिंचनाचा आधार.यापूर्वीच बियाणे, खते, कीडनाशके, मजुरी आणि मशागतीवरील वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात अतिरिक्त डवरणीचा खर्च पडत असल्याने उत्पादन खर्चात आणखी भर पडत आहे. महागाव परिसरातील बहुतांश शेती आजही कोरडवाहू स्वरूपाची आहे. पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी अनेक विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी समाधानकारक नाही. काही ठिकाणी पाण्याचा साठा कमी असल्याने सिंचनाची अडचण कायम आहे. त्यामुळे पुढील काळात नियमित पाऊस झाला तरच पिकांची वाढ चांगली होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात नियमित आणि संतुलित पाऊस झाल्यास सोयाबीन पिकाला त्याचा फायदा होऊ शकतो.आमची शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. सध्या झालेल्या पावसामुळे आशा निर्माण झाली आहे. मात्र पुढील काळातही चांगला पाऊस झाला तरच उत्पादन टिकून राहील. दीर्घकालीन सिंचन सुविधा उभारणे ही काळाची गरज आहे. - भगवान पंडागळे, शेतकरी, भांब.Farm Intercultivation: पावसाची उसंत मिळाल्याने आंतरमशागतीस वेग.सुरुवातीला पाऊस चांगला झाला, पण नंतर खंड पडल्याने तणांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे बैलजोडीने डवरणी करावी लागली. आता झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. पुढेही नियमित पाऊस झाला तर सोयाबीन चांगले येईल.- अतुल शिंदे, शेतकरी, महागाव.अलीकडच्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी बोअरवेल आणि विहिरींमधील पाणी अद्याप पुरेसे नाही. पावसाची सातत्याने गरज आहे. तेव्हाच सिंचनाचा प्रश्न सुटेल.- अविनाश भांगे, शेतकरी, करंजखेड.आमची शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. सध्या झालेल्या पावसामुळे आशा निर्माण झाली आहे. मात्र पुढील काळातही चांगला पाऊस झाला तरच उत्पादन टिकून राहील. दीर्घकालीन सिंचन सुविधा उभारणे ही काळाची गरज आहे.- भगवान पंडागळे, शेतकरी, भांब.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.