Amravati News: पहाटेचा अंधूक प्रकाश, हवीहवीशी वाटणारी सूर्यकिरणे, कानटोपी किंवा मफलर बांधून घराबाहेर पडणारी मंडळी अन् ऊब मिळावी, यासाठी शेकोटीच्या भवताल रंगलेला गप्पांचा फड, असे चित्र मेळघाटच्या गावखेड्यात दिसून येत आहे. त्यातच हव्याहव्याशा या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्टकांची पावले चिखलदऱ्याकडे वळू लागली आहेत. .विदर्भाच्या नंदनवनात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत आता आणखी वाढ झाली आहे. पावसाळ्यात होणारी गर्दी ओसरल्यावर आता हिवाळ्यातील गारव्याचा आस्वाद घेण्यासाठी हजारो पर्यटक विकेंडला येथे दाखल होत आहेत. त्यामुळे परत एकदा चिखलदऱ्यात पर्यटकांची रेलचेल दिसून येणार आहे. .Amravati Monsoon Rain: अमरावतीत सप्टेंबरमध्ये १२५ टक्के पाऊस.विशेष म्हणजे, चिखलदऱ्यासह सेमाडोह, माखला, कुकरू, मसुंडी अशा विविध भागांत थंडीची लाट आहे. सेमाडोह परिसरात नदीच्या काठावर अधिक गारवा वाढला आहे. सकाळी सकाळी दवबिंदूसुद्धा मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे पावसाच्या सरी आल्याचा भास होत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात गरम कपडे व शेकोटीचा आधार घेत आहेत. .मेळघाटातील आदिवासी बांधव शेतीच्या राखणदारीसाठी शेतातच राहत असल्यामुळे शेतीमध्ये शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहेत. वातावरणात चांगलाच गारवा आल्याने या शनिवारी तसेच रविवारी चिखलदऱ्यात परत एकदा हाउसफुल्ल गर्दी होण्याचे संकेत आहेत. .थंडी अधिक वाढणारथंडीची सुरुवात झाली असून थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षीपेक्षा या वर्षी लवकर थंडीला सुरुवात झाली आहे, अशी माहिती सिपना महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाचे डॉ. विजय मंगळे यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.