Palghar News: समुद्रसपाटीपासून शेकडो मीटर उंचीवरील जव्हारची ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळख आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले, धुक्याच्या चादरीत हरवलेले डोंगर, खोल दऱ्यांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मात्र, याच जव्हारमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ हनुमान पॉइंट येथे शासनाने कोट्यवधींचा खर्च करूनही मूलभूत सोयीसुविधा नसल्याचे विदारक चित्र आहे..हनुमान पॉइंट हा परिसर निसर्गप्रेमी, पर्यटक, छायाचित्रकार तसेच स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पर्यटन विकासाच्या नावाखाली विविध योजनांतून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला आहे, पण येथे स्वस्त दरात मुक्काम, खानपानाची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने पर्यटक फार काळ थांबत नाहीत. त्यामुळे जव्हारच्या पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे..Tourism Development: पर्यटन विकास योजनेतून वेळागरमधील जमीन वगळा.त्यामुळे येथे लवकरात लवकर विकास व्हावा अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.निसर्गसंपदेने नटलेला हनुमान पॉइंटचा विकास कागदोपत्री झालेला आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही येथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही..Tourism Policy: धरण क्षेत्रांतील पर्यटनाच्या जागांचा होणार ‘बाजार’.उभारलेली प्रसाधनगृह व्यवस्था निष्क्रिय असून, वापरण्यायोग्य नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच बसण्यासाठीचे बाकडे मोडकळीस आले आहे, तर अनेक दिवसांपासून पथदिवे बंद अवस्थेत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे..येथील काट्या मारुती मंदिर श्रद्धेचे स्थान मानले जाते, पण राजकीय उदासीनतेमुळे येथे सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.- राजेश धात्रक, पर्यटन संशोधक, जव्हार.हनुमान पॉइंट प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात असे प्रशासनाला कळवले आहे.- कुणाल उदावंत, उपनगराध्यक्ष, जव्हार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.