Jalkot News: जळकोट तालुक्यात मागील पाच दिवसांत पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील चौदापैकी तेरा तलाव शंभर टक्के भरल्याने अनेक गावच्या पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे..पावसाळा सुरू झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत मोठा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे अनेक तलाव कोरडे असल्याने तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भीती होती. तर, शेतकऱ्यांना रब्बी पिकाचे कोडे पडले होते. .Lonar Lake: ‘लोणार’ला देशात व्यवस्थापनासाठी दहावा क्रमांक .ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने दोन दिवस तालुक्याला झोडपून काढल्याने बघावे तिकडे पाणीच पाणी झाले होते. अनेक नद्यांना पूर येऊन शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतातील खरीप पिके पाण्याखाली गेली असल्याने अनेक शेतात आजही पाणी साचलेले दिसत आहे..Lake Revival: तलावांचं पुनरुज्जीवन करून मासेमारीची संधी निर्माण करता येईल का?.दोन दिवस तुफान पाऊस झाल्याने तालुक्यातील १४ पैकी तेरा तलाव शंभर टक्के भरून वाहत आहेत. तालुक्यातील सोनवळा, जंगमवाडी, माळहिप्परगा, रावणकोळा, ढोरसांगवी, चेरा एक, चेरा दोन, हावरगा, धोंडवाडी, गुत्ती एक, गुत्ती दोन साठवण तलाव शंभर टक्के भरले आहेत..तर, हळवाढवणा साठवण तलाव ८२.१२ टक्के भरला आहे. तालुक्यातील नव्वद टक्के साठवण तलाव भरले असल्याने आगामी काळात अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटणार असून, रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे..हाळद वाढवणा तलाव ८२ टक्क्यांवरहाळद वाढवणा येथील साठवण तलावात दरवर्षी जळकोट शहरातील श्रींचे विर्सजन होते. याच साठवण तलावात मागील आठ दिवसांखाली पाणी नसल्याने प्रशासनाला शहरातील श्रींचे विर्सजन करावे कुठे, असा प्रश्न होता. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने साठवण तलाव ८२ टक्के पाणी आल्याने दिलासा मिळाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.