Palghar News: घरगुती तसेच हॉटेल व्यावसायात टोमॅटोचा वापर सातत्याने होत असतो. टोमॅटोला बाजारात चांगली मागणी आहे. तसेच टोमॅटोपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जात असल्याने टोमॅटोच्या शेतीने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैय आले आहे. .वाडा तालुक्यातील देवघर येथील प्रगतशील शेतकरी रामदास शांताराम पाटील यांनी दीड एकर जागेवर सिमिनस कंपनीचे विराण वाणाच्या आठ हजार टोमॅटो रोपांची लागवड केली आहे. सध्या टोमॅटोचे फळ तयार झाले असून किमान पंधरा दिवसांत काढणी येणार आहे. .Tomato Farming : मल्चिंग, नेटमुळे टोमॅटो गुणवत्तेत वाढ.संपूर्ण हंगामात टोमॅटो फळाचे १२ ते १३ तोडे होतात. या दरम्यान पिकावर किड पडू नये, मुरडा येऊ नये तसेच डंक माशीचा वावर होऊ नये, यासाठी आठ दिवसाआड औषध फवारणी करणे आवश्यक असल्याचे शेतकरी रामदास पाटील यांनी सांगितले..Tomato Farming : शेतकरी वळताहेत टोमॅटो पिकाकडे.तिन्ही हंगामात उत्पादनाची खात्रीटोमॅटो पिकाची लागवड तिन्ही हंगामात करता येते. या पिकासाठी मध्यम ते भारी, परंतु उत्तम निचरा होणारी जमीन लागवड योग्य असते. पीक फुलावर असताना, फळांची वाढ होत असताना नियमित पाणी पुरवठा होणे महत्त्वाचे आहे..हंगामात बाजार भाव चांगला राहीला तर नफा होऊ शकतो. पण वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे नुकसान ही होऊ शकते.- रामदास पाटील, शेतकरी, देवघर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.