Karnataka Tobacco Farmers Protest: तंबाखूच्या किमतीत घसरण झाल्याने कर्नाटकातील शेतकऱ्यांची निदर्शने सुरू आहेत. यामुळे तंबाखू मंडळाला कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तंबाखूचे लिलाव थांबवावे लागले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी हुनसूर येथे लिलाव प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. तंबाखूच्या किमती घसरल्याच्या निषेधार्थ त्यांनी हुनसूर- के. आर. नगर महामार्ग रोखून धरला होता. तर गुरुवारी (दि. १९ फेब्रुवारी) पशुसंवर्धन आणि रेशीम मंत्री के. वेंकटेश यांना आंदोलक शेतकऱ्यांनी घेराव घातल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती..शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हुनसूर आणि पेरियापाटना येथील लिलाव स्थगित करण्यात आल्याची माहिती तंबाखू मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यंदा चांगल्या प्रतीच्या तंबाखूचा दर प्रतिकिलो सुमारे ३२० रुपये होता. तो आता २९४ ते २८० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. गेल्या वर्षी चांगल्या प्रतीच्या तंबाखूचा दर प्रति किलो ३८० रुपयांवर होता. तो यंदा १०० रुपयांनी खाली आला आहे. यामुळे संताप व्यक्त होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापाऱ्यांकडून मागणी कमी झाल्यानेही शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. परिणामी, मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगतात..Cigarette Pan Masala Tax Hike: सिगारेट कंपन्यांना दणका, ४० टक्के कर लागू, सरकारच्या निर्णयाला तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध.जीएसटीचा फटका, व्यापाऱ्यांची खरेदीकडे पाठशेतकऱ्यांनी तीव्र निदर्शने करत असल्याने अनेक केंद्रावरील लिलाव थांबवण्यात आले आहेत. १ फेब्रुवारी २०२६ पासून तंबाखूजन्य उत्पादनांवरील जीएसटी ४० टक्क्यांपर्यंत वाढला. यामुळे तंबाखू कंपन्यांनी खरेदी कमी केली आहे. यामुळे दर घसरल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकच्या तंबाखू उत्पादक संघटनेने केंद्राकडे या संकटावर उपाययोजना म्हणून व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे..Tax on Cigarette : तंबाखू उत्पादकांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट; सिगारेटवरील कर कमी करण्याची मागणी.अधिक मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील सुमारे ८ कोटी ५० लाख किलो तंबाखूपैकी सुमारे ४ कोटी ९० लाख किलो तंबाखूची लिलावाच्या माध्यमातून विक्री झाली आहे. उर्वरित ३ कोटी ६० लाख किलो तंबाखूची अद्याप बाजारात आवक झालेली नाही. दरम्यान, किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..कर्नाटकातील जुना म्हैसूर भाग हा उच्च प्रतीच्या तंबाखू उत्पादनासाठी ओळखला जातो. पण दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.